LMS 2023: चंदेरी दुनियेतील मोस्ट स्टायलिश कलाकारांचा गौरव, 'हे' आहेत पुरस्काराचे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 08:55 AM2023-09-13T08:55:13+5:302023-09-13T12:33:19+5:30

Lokmat Most Stylish Awards 2023 काल दिमाखात पार पडला.

बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी त्याच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असतो. वयाची साठी पार करुनही त्याने आपल्या उत्साहाने सर्वांना प्रभावित केलं आहे. फिटनेस आणि हटके स्टाइल यांच्यामुळे चर्चेत येणाऱ्या सुनील शेट्टीला लोकमत मोस्ट स्टायलिश टाइमलेस आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला या पुरस्कार सोहळ्यात ‘ लोकमत मोस्ट स्टायलिश अ‍ॅक्शन स्टार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक सुपरस्टार्सला मागे टाकत टायगर श्रॉफ यंदाचा अ‍ॅक्शनचा बादशहा ठरला. फिटनेस आणि डान्समुळे चाहत्यांना विशेष करुन लहान मुलांमध्ये तो प्रचंड लाडका आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'गणपत' सिनेमात त्याची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला 'लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.शिल्पा शेट्टीने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने या पुरस्कार सोहळ्याला चार चांद लावले. सुखी या तिच्या आगामी चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

प्रसिद्ध निर्माता जॅकी भगनानी त्याच्या स्टाईलसाठीही ओळखला जातो. सध्या बॉलिवूडमध्ये तो यशस्वी निर्माता आहे. लवकरच त्याचा 'गणपत' सिनेमा येणार आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ एकत्र दिसणार आहेत. जॅकीच्या कामाची दखल घेत त्याला यंदाचा 'लोकमत मोस्ट स्टायलिश प्रोड्युसर' पुरस्कार देण्यात आला.

अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात केलेल्या कामाची लोकमतने दखल घेतली. ला Most stylish Humanitarian हा पुरस्कार देत त्याचं कौतुक करण्यात आलं. लोकांना त्यांच्या मूळगावी पोहोचवण्यापासून ते त्यांना रोजगार उपलब्ध होईपर्यंत सोनू सूदने अनेकांना मदत केली.

'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राला यंदाच्या लोकमत मोस्ट स्टायलिश गेम चेंजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 'कठल' आणि नुकताच रिलीज झालेल्या 'जवान' सिनेमातून तिने आपल्या अभिनयाचं प्रदर्शन केलं. सान्या नक्कीच एक गेम चेंजर ठरली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला ‘ लोकमत मोस्ट स्टायलिश ग्लॅम आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर अनन्याने मराठीत आभार मानले. “थँक्यू लोकमत...मी आपली खूप आभारी आहे”, असं अनन्या मराठीत म्हणाली. नुकताच तिचा 'ड्रीम गर्ल 2' रिलीज झाला.

आपल्या भारदस्त आजावाने सर्वांना प्रभावित करणारा अभिनेता शरद केळकरला Most stylish Path Breaker(male) या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं.जवळपास १९ वर्षांपासून शरद कलाविश्वात सक्रीय आहे. या काळात त्याने अनेक विविधांगी भूमिका साकारल्या. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'लक्ष्मी' या सिनेमात शरदने लक्ष्मी ही तृतीयपंथी भूमिका साकारली होती.

फॅशन म्हटलं की मलायका अरोराचं नाव येतंच. ४८ वर्षांची मलायका तरुणींना लाजवेल इतकी सुंदर आणि फिट आहे. तिच्या योगाचे फोटो, व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. लोकमतने तिच्या क्रेझची दखल घेत तिला यंदाच्या 'लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा' या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

सई मांजरेकर हे नाव मराठीसह बॉलिवूडलाही नवीन राहिलं नाही. सईने सलमान खानच्या 'दबंग 3' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आणि पहिल्याच सिनेमातून लोकप्रिय झाली. तिला Lokmat Most stylish Emerging Gen z performer या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

अभिनेत्री रकुल प्रित सिंहला 'मोस्ट स्टायलिश प्रॉमिसिंग अभिनेत्री' या पुरस्काराने गौरवण्यात आले.

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री राधिका मदनला लोकमत 'मोस्ट स्टायलिश ब्रेकथ्रु टॅलेंट' पुरस्कार मिळाला.

बॉलिवूड कोरिओग्राफर टेरेन्स लुईसने यंदाचा 'लोकमत मोस्ट स्टायलिश कोरिओग्राफर' पुरस्कार पटकावला.

करण बोथरा यांना 'Lokmat Most Stylish Entrepreneur' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पत्रकारिता क्षेत्रातील 'मोस्ट स्टायलिश जर्नलिस्ट' हा अवॉर्ड पलकी शर्मा यांना देण्यात आला.

नीता शालिमकरला यंदाचा 'मोस्ट स्टायलिश कंटेंट क्रिएटर' अवॉर्ड मिळाला.

अभिनेता मनिष पॉलने 'रफुचक्कर' मधून ओटीटी वर पदार्पण केलं. त्याला लोकमत 'मोस्ट स्टायलिश ओटीटी डेब्युटंट' पुरस्काराने गौरविण्यात आलं.

बिग बॉस फेम शालीन भनोत यंदाचा लोकमत 'मोस्ट स्टायलिश टीव्ही पर्सनॅलिटी' ठरला.

'लोकमत मोस्ट स्टायलिश डिझायनर्स' हा पुरस्कार शंतनु आणि निखिल या जोडीला मिळाला.

पार्श्वगायिका शिल्पा राव हिला 'लोकमत मोस्ट स्टायलिश सिंगर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अभिनेत्री मौनी रॉयला 'लोकमत मोस्ट स्टायलिश पाथ ब्रेकर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे 'लोेकमत मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन' पुरस्कार मिळाला.

अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या हटके अभिनयाने आणि स्टाईलने ट्रेंड सेट केला आहे. त्याला लोकमत 'मोस्ट स्टायलिश ट्रेंडसेटर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

'धडक' सिनेमातून पदार्पण करणारा अभिनेता ईशान खट्टर 'मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन' ठरला

गायक स्टेबिन बेनने 'मोस्ट स्टायलिश म्युझिक परफॉर्मर' पुरस्कार पटकावला.

अभिनेत्री नुसरत भरुचाने नुकतेच 'अकेली' सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. तिला लोकमने 'मोस्ट स्टायलिश ट्रेंडसेटर'ने गौरवले.

बॉलिवूड अभिनेत्री संयमी खेरला यंदाच्या मोस्ट स्टायलिश इनस्पायरिंग परफॉर्मर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘घूमर’ या चित्रपटातील कामगिरीसाठी संयमीला हा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटात तिने महिला क्रिकेटरची भूमिका साकारली आहे.