कॅन्सरवर यशस्वी मात करणाऱ्या लिजा रेच्या बोल्ड फोटोंनी आजही सोशल मीडियावर माजते खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 20:42 IST2019-04-04T20:40:07+5:302019-04-04T20:42:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री लिजा रेचा आज ४७वा वाढदिवस आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करत आहे. लिजा नेहमी सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

लिजा रेचा जन्म ४ एप्रिल, १९७२ साली टोरंटोमध्ये झाला.

लिजाने वयाच्या १६व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करून करियरला सुरूवात केली.

लिजाच्या जीवनात बरेच चढउतार आले. मात्र जेव्हा तिला कर्करोग झाला हे समजले त्यावेळी तिचे जीवन बदलले.

२००९ साली लिजाने स्वतः याबाबतचा खुलासा केला की तिला मल्टीपल मायलोमा नामक कॅन्सर आहे.

२०१० साली स्टेम सेल ट्रान्सप्लांट करून तिने कर्करोगावर यशस्वी मात केली.

लिजाने अभिनय क्षेत्रातील करियरला तमीळ चित्रपट नेताजीमधून केली होती.

बॉलिवूडमध्ये तिने २००१ साली कसूर चित्रपटातून पदार्पण केले.

त्यानंतर लिजा दीपा मेहताचा चित्रपट वॉटरमध्ये जॉन अब्राहमसोबत झळकली होती.

१७ सप्टेंबर, २०१८ साली लिजाने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला.