कोणी उचलला होता प्रियंका-निकच्या रॉयल वेडिंगचा खर्च, इतक्या वर्षानंतर समोर आली गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 12:46 IST2021-09-04T12:39:01+5:302021-09-04T12:46:53+5:30
ट्रेंडिंग कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न प्रचंड चर्चेत राहिलेल्यापैकी एक होते.प्रियंका आणि निकचं लग्न दोन पद्धतीने पार पडले होते. २ डिसेंबर २०१८ ला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडले होते. जोधपूरमध्ये उमेद महल येथे आलिशान पद्धतीने हा विवाहसोहळा रंगला होता.

प्रियंका आणि निकच्या या रॉयल वेडिंगचे फोटो आजही इंटरनेट व्हायरल होतात.
फोटो पाहून थाटात पार पडलेल्या लग्नाचा खर्च किती करण्यातअसेल याविषयी तर्कवितर्क लावले जातात.
दोघांपैकी कोणी संपूर्ण लग्नात खर्च केला असावा यावरही प्रचंड चर्चा होत असतात.
आता खुद्द प्रियकांनाचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
यावर प्रियंकाने सांगितले की, या लग्नासाठी खर्च कोण्या एकट्याने केलेला नसून दोन्ही मंडळींकडून करण्यात आला होता.
लग्नाच्या खर्चात जितका निकचा वाटा होता तितकाच प्रियंकाचाही होता.
फक्त एका गोष्टीचा खर्च संपूर्ण निकने केला होता.
महागडी इंगेजमेंट रिंग निकने घेतली होती.
लग्नातले कपडे आणि ज्वेलरीसाठीही दोघांनी मिळूनच खर्च केला होता.
लग्नातला खर्च वाटून घेतल्यामुळे रॉयल वेडिंग करण्याची दोघांची इच्छा पूर्ण झाल्याचे प्रियंकाने सांगितले होते.
प्रियका निकच्या लग्नाचा एकूण खर्च तीन कोटींहून अधिक असल्याची माहिती समोर आली होती.