Jeh Birthday: तीन थरांचा केक, स्पायडरमॅन थीम अन्...; करीना-सैफच्या लाडक्या जेहचं बर्थडे सेलिब्रेशन, राहाने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:15 AM2024-02-22T10:15:28+5:302024-02-22T10:19:34+5:30

जेहच्या बर्थडे पार्टीत राहाची चर्चा; आलिया-रणबीरच्या लेकीच्या क्यूटनेसने वेधलं लक्ष

करीना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका लेक जेह हा लोकप्रिय स्टारकीड आहे. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी जन्म झालेला जेह तीन वर्षांचा झाला आहे.

जेहचं तिसऱ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन दणक्यात पार पडलं. त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.

जेहच्या तिसऱ्या बर्थडे खास स्पायडरमॅन थीम करण्यात आली होती. स्पायडरमॅनचा तीन थरांचा खास केक होता.

करीना-सैफच्या लाडक्या जेहच्या वाढदिवसाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टारकिड्सनेही हजेरी लावली होती.

जेहच्या बर्थडे पार्टीत रणबीर-आलियाच्या राहाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रणबीरबरोबर राहा दिसून आली. बापलेकाने ट्विनिंग केल्याचंही दिसून आलं.

लाडक्या जेहच्या बर्थडेला सैफची बहीण सोहा अली खानही उपस्थित होती. जेहच्या बर्थडेचे फोटो व्हायरल झाले आहेत.