करिना कपूरने शाहरूखची पत्नी गौरी खानचे केले कौतुक, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-25T14:59:01+5:302018-06-27T19:53:44+5:30
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर नुकतीच शाहरूख खानची पत्नी आणि डिझायनर गौरी खानच्या गौरी डिझाइंस येथे पोहोचली होती. यावेळी करिना व्हाइट टी-शर्ट, ब्लू डेनिम आणि ब्राउन शूज घालून आली होती. करिना या लूकमध्ये एकदम परफेक्ट दिसत होती. यावेळी करिनासोबत तिची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री अमृता अरोरा हीदेखील होती. अमृताने यावेळी चेक मिडी परिधान केला होता. गौरीदेखील यावेळी खूपच स्टायलिश दिसत होती. यावेळी करिनाने गौरीचे तोंडभरून कौतुक केले. तिने म्हटले की, सर्वात उत्कृष्ट डिझायनर पैकी गौरी खान एक आहे. याबाबतचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.