ट्रेंडी डाएट नाही, मग काय आहे सीक्रेट? ४८ वर्षीय मल्लिका शेरावतच्या सौंदर्याचं रहस्य! रोज करते हे सोपे आसन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:57 IST2025-09-25T17:52:59+5:302025-09-25T17:57:58+5:30
बॉलिवूडची जलेबी बाई आणि बोल्ड भूमिकांमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. वयाच्या ४८व्या वर्षीही मल्लिका शेरावत (mallika sherawat) फिट अँड फाईन आहे.

बॉलिवूडची जलेबी बाई आणि बोल्ड भूमिकांमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. वयाच्या ४८व्या वर्षीही मल्लिका शेरावत (mallika sherawat) फिट अँड फाईन आहे.
वयाच्या ४८ वर्षातही अभिनेत्री २८ वर्षांइतकी फिट दिसते. तिच्या या फिटनेसचं रहस्य कोणत्याही ट्रेंडी डाएट किंवा शॉर्टकट उपाय नाही. मल्लिकाने तिचं शरीर सुडौल आणि निरोगी ठेवण्याचं सीक्रेट उघड केलंय. ती दररोज 'आयंगार' योग करते.
मल्लिकाने इंस्टाग्रामवर सांगितलं की, तिच्या फिट राहण्याचं रहस्य कोणत्याही फास्ट फूड किंवा ट्रेंडी डाएटमध्ये नाही. ती नियमित आणि शिस्तबद्ध योगाभ्यासावर लक्ष केंद्रित करते. रोजचा साधा 'आयंगार' योगच तिचं शरीर निरोगी, लवचिक आणि टोंड ठेवते.
बी.के.एस. आयंगार यांनी विकसित केलेली 'आयंगार' योग ही योगाची एक शैली आहे, जी मुद्रेची अचूकता, योग्य शरीर रचना आणि सुरक्षितपणे प्रॉप्सचा वापर करण्यावर भर देते. यामध्ये बेल्ट, ब्लॉक आणि दोऱ्यांचा वापर करून कोणत्याही इजाशिवाय अभ्यास केला जातो. हा योग सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे आणि दीर्घकाळ आसनांमध्ये राहिल्याने शरीराची शक्ती आणि लवचिकता वाढते.
मल्लिकाच्या मते, नियमित योगाभ्यास केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हे एकाग्रता, संयम आणि सततच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो. कोणताही शॉर्टकट किंवा ट्रेंडी उपाय कायमस्वरूपी परिणाम देऊ शकत नाही, पण सततच्या सरावाने दीर्घकाळ फिटनेस टिकून राहतो.
मल्लिका मानते की फिटनेसचा अर्थ केवळ सुंदर दिसणे नाही, तर आरोग्य आणि जीवनशैलीत संतुलन राखणे आहे. तिच्यासाठी योग केवळ व्यायाम नसून, दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.
४८ वर्षांच्या वयातही २८ वर्षांसारखी टोंड बॉडी ठेवण्याची इच्छा असलेल्या लोकांनी मल्लिकाप्रमाणेच साधा, सुरक्षित आणि नियमित योगाभ्यास स्वीकारला पाहिजे. ट्रेंडी डाएट किंवा शॉर्टकटऐवजी शिस्त आणि सातत्य हीच दीर्घकाळ आरोग्य आणि फिटनेस टिकवून ठेवण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे.
मल्लिका शेरावतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती 'मर्डर', 'ख्वाहिशें', 'डर्टी पॉलिटिक्स', प्यार के साइड इफेक्ट्स', 'गुरु', 'वेलकम', ', 'बचकर रहना रे बाबा', 'डबल धमाल' या सिनेमात झळकली आहे.
शेवटची मल्लिका शेरावत २०२५ साली 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीयो' सिनेमात कॉमेडी भूमिका साकारताना दिसली.