IIFA 2017 : बॉलिवूडमधील घराणेशाही...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-21T12:04:09+5:302018-06-27T20:17:07+5:30
बॉलिवूड विश्वात घराणेशाहीच्या मुद्याला एका अर्थी अभिनेत्री कंगणा रणौतनेच वाचा फोडली. तिच्या एका वक्तव्यामुळे थेट आयफा पुरस्कार सोहळ्यामध्येही तिच्यावर निशाणा साधण्यात आला. करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवन यांच्या स्किटमधून कंगनावर उपरोधिक टिका करण्यात आली. त्याचं झालं असं की, ‘वरूण धवनला ‘बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोल’चा अवॉर्ड मिळाल्यावर करण जोहर कंगनाला लक्ष्य करताना दिसला. ‘मी माझ्या वडिलांमुळे इथे आहे, सैफ त्याच्या आईमुळे तर वरूण आपल्या वडिलांमुळे...व्हॉट अ बिग डिल?’, असे तो म्हणाला. हाच धागा पकडून सैफ ‘बोले चूडियां, बोले कंगना...’ असे गाऊ लागला. ‘करण-कंगना’ हा वाद तर बॉलिवूडचा सर्वांत हॉट वादांपैकी एक आहे. आता मुद्दा हा आहे की, ‘बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सध्या करिअर करत आहेत. असे किती कलाकार आहेत जे त्यांचे घराणे मिरवतात. घेऊया अशा काही कलाकारांचा आढावा...’