Sanjay dutt: पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:18 AM2023-02-11T11:18:25+5:302023-02-11T11:29:24+5:30

Sanjay dutt: मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. सध्या मान्यता दुबईमधल्या घरात मुलांसोबत राहते आहे. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत.

संजू बाबा या नावाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये फेमस असलेला अभिनेता म्हणजे संजय दत्ता. प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे संजय अनेकदा चर्चेत राहिला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता हे बॉलिवूडचे हॅप्पी मॅरिड कपल आहेत. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

संजय दत्तप्रमाणेच त्याची पत्नी मान्यता दत्तही अनेकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. मान्यता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती तिच्या घराचे फोटो शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

त्यामुळेच संजय दत्त आणि मान्यता यांचं आलिशान घर आतून कसं दिसतं ते पाहुयात.(फोटो इन्स्टाग्राम)

लग्नानंतर मान्यताने वांद्र्यातील पाली हिल येथील संजय दत्तच्या घरात गृहप्रवेश केला. तेव्हापासून या घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा मान्यताने सुरेखरित्या सजवला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

संजय आणि मान्यताचं घर प्रचंड आलिशान आणि प्रशस्त आहे. या घरात अनेक पेटिंग्स लावण्यात आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

घरातील प्रत्येक गोष्ट आर्टशी संबंधित आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मान्यता अनेकदा घरामध्येच तिचं फोटोशूट करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. सध्या मान्यता दुबईमध्ये याच घरात मुलांसोबत राहते. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

ड्राईंग रुमपासून ते किचनपर्यंत प्रत्येक गोष्ट खास करण्यावर मान्यताने भर दिला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)