"ज्यांच्यावर गणपतीची कृपा..."घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाचं वक्तव्य, सुनिता म्हणाली "वाद ऐकण्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:18 IST2025-08-28T13:12:14+5:302025-08-28T13:18:32+5:30
बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांनी घराघरांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना केली. विविध मंडळांसह घरोघरी बाप्पाची मनोभावे पूजा केली जात आहे.
गणेशोत्सवानिमित्त बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होत्या. पण गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने एकत्र येऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, या जोडप्याने गणपती बाप्पाचे एकत्र स्वागत केले आणि पापाराझींना मिठाई वाटली.
या खास प्रसंगी गोविंदा आणि सुनीता यांनी एकाच रंगाचे कपडे घातले होते, ज्यात ते दोघेही सुंदर दिसत होते.
यावेळी त्यांचा मुलगा यशवर्धन देखील त्यांच्यासोबत गणपतीची पूजा करताना दिसला.
घटस्फोटाबद्दल माध्यमांशी बोलताना गोविंदा म्हणाला, "ज्यांच्यावर गणपतीची कृपा असते, देवाची कृपा असते, त्याच्या कुटुंबातील संकटं दूर होतात, दुःखं आणि अडथळे दूर होतात आणि समाजासोबत एकत्र राहू शकतो. तुमच्या सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही पण एकत्र राहू अशी प्रार्थना करतो".
पापाराझींनी घटस्फोटाबद्दल विचारताच सुनीताने थेट विचारलं, "तुम्ही वाद ऐकण्यासाठी आला आहात की गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आला आहात?". याचवेळी, गोविंदानेही सर्वांना आपल्या मुलांसाठी, टीना आणि यशवर्धन यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
गोविंदा म्हणाला, "तुम्ही सर्वांनी माझ्या मुलांसाठी प्रार्थना करावी, त्यांना मदत करावी. बाप्पाला प्रार्थना करतो की त्यांना त्यांच्या कामात यश मिळावे आणि त्यांचं नाव माझ्यापेक्षाही मोठं व्हावं".