गौहर खानचा कूल व स्टाइलिश लूक, वांद्रे येथे लंच एन्जॉय करताना झाली स्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:47 IST2019-03-29T19:43:20+5:302019-03-29T19:47:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान आपल्या लूक आणि विधानांमुळे नेहमी चर्चेत असते.
गौहर बऱ्याच कालावधीपासून रुपेरी पडद्यावरून गायब आहे. मात्र चाहत्यांमध्ये चर्चेत राहणे तिला बरोबर माहित आहे.
गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ७ची विजेती होती.
गौहरने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले.
रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयरमध्ये गौहरसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता.
अखेरची गौहर विद्या बालन बेगम जान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.