'तू रिटायर हो..’ 'गदर' हिट झाल्यानंतर संजय लीला भन्साळींना अमिषाला दिला संन्यास घेण्याचा सल्ला, म्हणाली-त्यावेळी मला..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 05:00 PM2023-08-23T17:00:22+5:302023-08-23T17:59:24+5:30

'गदर' हिट झाल्यावर संजय लीला भन्साळी यांनी अमिषाला अभिनयातून रिटायर होण्याचा अजब सल्ला दिला होता.

अमिषा पटेल सध्या तिच्या गदर २ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. सनी देओलने त्याच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

सकिनाची मुख्य भूमिका असलेल्या अमिषाने गदरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. गदर: एक प्रेम कथा पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी तिला अभिनयातून संन्सास घेण्याचा सल्ला दिला होता.

अमिषच्या करिअरमधील पहिलावहिला चित्रपट जबरदस्त गाजल्यानंतर 'गदर' रिलीज झाला होता. आमिषाचे हे दोनही सिनेमा चांगले हिट झाले होते त्यामुळे तिचं करिअर पीकवर होते.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अमिषाने सांगितले, गदर पाहिल्यानंतर भन्साळींनी एक सुंदर पत्र लिहिले होते. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक यात केलं होते.

नंतर जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले, अमिषा आता तू निवृत्त झालं पाहिजेसं. ’ ते असं का बोलतायत असा मला प्रश्न पडला होता. मला काहीच समजत नव्हतं”, असं अमिषाने सांगितलं.

पुढे ती म्हणाली, “तू या दोन चित्रपटांमधूनच एवढं यश मिळवलंस जे काही कलाकार त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये मिळवत नाहीत, असं ते मला म्हणाले.''

''आयुष्यात एकदाच मुघल-ए-आझम, मदर इंडिया, पाकिजा, शोले यांसारखे सिनेमा बनतात. तुझ्या आयुष्यातला दुसराच चित्रपट इतका हिट ठरला आहे. आता पुढे काय करशील?, असा ते मला म्हणाले.”

त्यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीत नवीनच असल्याने भन्साळींना नेमकं काय म्हणायचं होतं हे समजलं नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. पण त्यांनी जे काही सांगितलं ते खरं ठरले. कारण गदरनंतर अमिषाचा एकही सिनेमा चालला नाही. अमिषाने हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, भुलभुलैय्या, हमराज, थोडा प्यार थोडा मॅजिक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र तिच्या पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणे हे हिट ठरले नाहीत.