"शुक्रवारी वडिलांचा सिनेमा फ्लॉप झाला आणि रविवारी आम्ही रस्त्यावर आलो...", सेलिब्रेटीनं दिला कटू आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 03:30 PM2023-11-24T15:30:57+5:302023-11-24T15:33:26+5:30

ही सेलिब्रेटी फक्त प्रसिद्ध कोरिओग्राफरच नाही तर ती यशस्वी चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि निर्माती-दिग्दर्शक फराह खानने आपल्या मेहनतीवर इंडस्ट्रीत आपली छाप उमटविली आहे. मात्र एक वेळ असा होता, जेव्हा तिला संघर्षाचा सामना करावा लागला होता. खरेतर फराहने डान्सर म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

ती फक्त प्रसिद्ध कोरिओग्राफरच नाही तर ती यशस्वी चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. मात्र तिला इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप वर्षे संघर्ष करावा लागला होता. याचा खुलासा खुद्द फराहने भारती सिंगच्या शोमध्ये केला होता. या शोमध्ये त्याने आपल्या आयुष्यातील अनेक न ऐकलेल्या गोष्टी सर्वांसोबत शेअर केल्या. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

फराहचे वडील कामरान खान बॉलिवूडमधले स्टंटमॅन होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यानंतर त्यांनी चित्रपटांची निर्मितीही सुरू केली. त्यावेळी फराह आणि तिच्या कुटुंबाचे आयुष्य चांगले चालले होते. पण नंतर अचानक त्याच्या आयुष्यात वादळ आले आणि सगळंच बदलून गेलं.

याबद्दल बोलताना फराह म्हणाली की, मी लहान असताना आमचं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं. पण आमच्या घरी साजिदचा जन्म झाला तेव्हा सगळंच बदललं.

फराह खान म्हणाली, त्यावेळी माझ्या वडिलांनी एक चित्रपट बनवला होता. जो शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि फ्लॉप झाला आणि रविवारपर्यंत आम्ही रस्त्यावर आलो. कारण त्यावेळी प्रत्येकजण स्वतःचे पैसे गुंतवून चित्रपट बनवत असे आणि वडिलांनीही त्या चित्रपटासाठी घर गहाण ठेवले होते.

त्यावेळी आमची परिस्थिती अशी होती की माझ्या आईला तिचे दागिनेही विकावे लागले. तसेच, आमच्याकडे तीन घरे होती, ती सर्व विकली गेली आणि आम्हाला एका छोट्या घरात राहावे लागले.

यादरम्यान फराह म्हणाली, बर्‍याचदा आम्हाला ऐकायला मिळते की तुम्ही जर इंडस्ट्रीतील असाल, जर तुम्ही इनसाइडर असाल तर तुमच्यासाठी सर्व काही सोपे होईल. पण असे होत नाही, हे आमच्यासाठी आणखी कठीण आहे, कारण आम्ही यश पाहिले असते.

फराहचे वडील कामरान हे अपयश सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी खूप मद्यपान करण्यास सुरुवात केली. यामुळे एके दिवशी त्यांचे यकृत फुटले आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर फराह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करू लागली. फराह खानला 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातून कोरिओग्राफर म्हणून ओळख मिळाली.