टायगर श्रॉफच्या फिटनेसचे सीक्रेट तुम्हाला माहीत आहे काय?, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2018-01-02T13:05:14+5:302018-06-27T20:01:05+5:30

‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारा अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयाबरोबर फिट बॉडीमुळेही ओळखला जातो. इंडस्ट्रीमध्ये टायगर असा अभिनेता आहे, ज्याच्या परफेक्ट बॉडीवर प्रेक्षकांसह त्याचे सहकलाकारही फिदा आहेत. मात्र टायगरच्या या फिट बॉडीचे सीक्रेट तुम्हाला माहिती आहे काय? एका वाक्यात सांगायचे झाल्यास टायगर ‘फिटनेसशी नो कॉम्प्रोमाइज’ करीत असल्यानेच त्याने हे पिळदार शरीर मिळविले आहे. जिममध्ये टायगर तासन्तास वर्कआउट करतो, त्याचबरोबर आपला डायटही नियमित फॉलो करतो. तो प्रत्येक दिवशी आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या पार्टवर फोकस करून वर्कआउट करीत असतो.