दीपिका पदुकोणचा कोणता लूक तुम्हाला आवडला,कळवा आम्हाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-08-01T08:59:02+5:302018-06-27T20:16:36+5:30

'ओम शांती ओम' सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री करत दीपिकानं सा-यांची मनं आपल्या अभिनयानं जिंकली. मोहून टाकणारं सौंदर्य, घायाळ करणा-या अदा आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अल्पावधीतच तिनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. शांती, मीना, वेरॉनिका, पिकूमधली बंगाली घरात वाढलेली लेक असो किंवा मग मस्तानी तिची प्रत्येक भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली. तिच्या प्रत्येक अदांवर रसिक फिदा झाला. त्यामुळेच सोशल मीडियावरही दीपिकाच्या प्रत्येक लूकला कमेंटस लाईक्स मिळत असतात. चला तर मग पाहुयात दीपिका पदुकोणचा कोणता लूक तुम्हाला जास्त आवडला आणि आम्हाला कळवा.