कॅन्सरनं पत्नीला हिरावलं, अभिनेता १८ वर्षे लहान प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात, राहतोय लिव्ह इनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:39 IST2025-09-27T12:30:28+5:302025-09-27T12:39:35+5:30
२०१३ पासून हा अभिनेता मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यांनी आतापर्यंत लग्न केलेलं नाही. पण लिव्ह-इनमध्ये राहूनही त्यांनी एक मजबूत नातं जपलं आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, जे सुरुवातीला खूप संघर्ष करतात आणि नंतर हळूहळू आपली मेहनत आणि जिद्दीने एक खास ओळख निर्माण करतात. अशाच प्रसिद्ध कलाकारांमध्ये राहुल देवचं नाव समाविष्ट आहे.
राहुल देवने आपल्या क्षेत्रात कठोर परिश्रमाने यश मिळवलं, पण त्याची सुरुवात खूप वेगळी होती. तसेच त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं आहे. त्याने अभिनय क्षेत्रात नकारात्मक भूमिकेतून सुरुवात केली.
राहुल देवचा जन्म २७ सप्टेंबर १९६८ रोजी दिल्लीत झाला आणि त्याने आपलं शिक्षणही इथेच पूर्ण केलं. त्याचे वडील पोलीस दलात सहाय्यक आयुक्त होते, ज्यामुळे कुटुंबात शिस्त आणि कडकपणाचं वातावरण होतं.
राहुलचा दिवंगत भाऊ मुकुल देव हा देखील बॉलिवूड अभिनेता होता. याच वातावरणात राहुल यांचा अभिनयाकडे ओढा वाढला. त्याने २००० साली 'चॅम्पियन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली, जी त्यांच्यासाठी मोठी यशस्वी ठरली.
सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका साकारून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रेक्षकांना त्याची ही भूमिका खूप आवडली आणि राहुल हळूहळू बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांमध्ये सामील झाला. राहुल देवचा करिअर प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता, पण त्याने कधीही हार मानली नाही. त्याचे फिटनेस आणि अभिनयासाठी खूप कौतुक झालं. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही दुःखद घटनाही घडल्या.
त्याची पत्नी रीना देवचं २००९ मध्ये कॅन्सरने निधन झालं, ज्यामुळे तो खूप खचला. या कठीण काळात त्यांनी आपल्या मुलाचं पालनपोषण एकट्याने केलं. यानंतर त्याची भेट मॉडेल आणि अभिनेत्री मुग्धा गोडसेशी झाली, जी त्याच्यापेक्षा १८ वर्षांनी लहान आहे.
राहुल देव आणि मुग्धा गोडसे २०१३ पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी आतापर्यंत लग्न केलेलं नाही. पण लिव्ह-इनमध्ये राहूनही त्यांनी एक मजबूत नातं जपलं आहे.
मुग्धा गोडसेबद्दल बोलायचं झाल्यास, ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अजय देवगण आणि संजय दत्त यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले.
तसेच मुग्धा गोडसे अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे. 'फॅशन' चित्रपटातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.