बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचे ड्रिम होम आतून असे दिसते, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-05-03T09:37:23+5:302018-06-27T19:51:17+5:30

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिच्या मनाली येथील घराची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगनाच्या या ड्रीम हाउसचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी केवळ बाहेरून या घराचा नजारा दिसत होता. आता कंगनाने तिच्या घराचे एक फोटोशूट केले असून, कंगना राणौत डेली नावाच्या ट्विटर अकाउंटवरून ते शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगनाच्या ड्रिम हाउसचा जबरदस्त नजारा बघावयास मिळतो. हे फोटो बघून खरोखरच कंगनाचे घर ड्रिम असल्याची प्रचिती झाल्याशिवाय राहात नाही.