रील मुव्ही पुरस्कारात या तारकांनी लावली होती हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 18:05 IST2019-03-27T17:49:17+5:302019-03-27T18:05:52+5:30

रिल मुव्ही पुरस्कार सोहळ्यात आलिया भट साडीत खूपच छान दिसत होती. या पुरस्कार सोहळ्यात तिला राझी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
फरहान अख्तरसोबत असलेल्या नात्यामुळे सध्या शिबानी दांडेकर चांगलीच चर्चेत आहे. शिबानीने या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले
रहेना है तेरे दिल में फेम दिया मिर्झा काळ्या रंगाच्या पेहरावात खूपच क्यूट दिसत होती.
या पुरस्कार सोहळ्यातील कोकणा सेन शर्माच्या लूकची देखील चांगलीच चर्चा झाली.
मेड इन हेवन या वेबसिरिजमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री सोभिता धुलिपाला या पुरस्कार सोहळ्यात ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली.
दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अपारशक्ती खुराणाने फोटोग्राफर्सना पाहाताच अशी कूल पोझ दिली.
दिव्या दत्ताने एकदम कूल अंदाजात या पुरस्कार सोहळ्यात एंट्री मारली.
लिपस्टिक अंडर माय बुरखा फेम आहना कुमराच्या चेहऱ्यावर खूपच छान स्माईल दिसून आले.
पंकज त्रिपाठीचा एकदम वेगळा लूक या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाला.
बोमन इराणी आणि सौरभ शुक्ला यांनी डॅशिंग अंदाजात हजेरी लावली
अनुप सोनी आणि शेखर सुमन दोघेही स्टायलिश अंदाजात दिसले.
बधाई हो या चित्रपटामुळे सध्या गजराज राव यांना चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे.