मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन; कॅमेरे बघताच बदलले मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-04-03T12:45:47+5:302018-06-27T19:53:07+5:30

अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर नुकताच एका मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला. सोमवारच्या सायंकाळी हर्षवर्धन एका रेस्टॉरंटमध्ये मिस्ट्री गर्लसोबत डिनर करण्यासाठी पोहोचला होता. येथून बाहेर पडताना तो कॅमेºयात कैद झाला. मात्र कॅमेरे दिसताच दोघेही वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाले. दरम्यान, असा अंदाज लावला जात आहे की, ही मिस्ट्री गर्ल अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला असावी.