अनिल कपूरसह श्रीदेवीची रुपेरी पडद्यावर जमली जोडी,या सिनेमात या जोडीनं जिंकली रसिकांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-02-26T06:05:30+5:302018-06-27T19:55:57+5:30
झगमगत्या तारांगणातील चांदणी आणि सौंदर्याचे लेणं लाभलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीदेवी यांनी विविध सिनेमात वेगवेगळ्या अभिनेत्यासह काम केलं.मात्र त्यांची जोडी जमली ती अभिनेता अनिल कपूरसोबत.ही जोडी रसिकांना चांगलीच भावली.दोघांमध्ये अशी काही केमिस्ट्री होती की रसिक आपसुकच थिएटरकडे खेचले जायचे.श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्यात असं काही ट्युनिंग होतं की सेटवर जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळायचा आणि सिनेमा सुपरडुपर हिट व्हायचा.८० आणि ९० च्या दशकात रसिकांना या जोडीे अक्षरशा वेड लावलं होतं.या जोडीने जवळपास १३ सिनेमात एकत्र काम केलं आणि सगळे सिनेमा सुपरहिट ठरले.