चित्रपटांची इतकी आवड की अर्धवटच सोडलं शिक्षण; 13 वर्ष मोठ्या अभिनेत्याला करतेय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 04:25 PM2023-10-30T16:25:17+5:302023-10-30T16:44:31+5:30

करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध आहे. अनन्या पांडेचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण तुम्हाला माहित आहे का की करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून अनन्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे.

अनन्या पांडे हिने चित्रपटांसाठी तिचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. एंटरटेनमेंट रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडेने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे.

शालेय शिक्षणानंतर अनन्या लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. अभिनेत्रीने ग्रॅज्युएशननंतर आपलं शिक्षण सोडलं आणि आपल्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित केले.

रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे 2017 मध्ये पॅरिसमध्ये व्हॅनिटी फेअरच्या 'ले बाल डेब्यूटंट्स' कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यानंतर अनन्याने 2019 मध्ये करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अभिनेत्रीने तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा असलेला अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत हँगआऊट करत असते. अनन्या आणि आदित्यने त्यांचे नाते अधिकृत केले नसले तरी अनन्या आणि आदित्य एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

अनन्या पांडेच्या नेटवर्थबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने फार कमी वेळात यशाचं शिखर गाठलं आहे. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर अनन्या पांडेची एकूण संपत्ती 72 कोटी रुपये आहे.

एका चित्रपटासाठी अभिनेत्री 2-5 कोटी घेते. अनन्या केवळ चित्रपटातूनच नाही तर अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करते. अभिनेत्रीचे असंख्य चाहते असून तिच्या अदांवर ते फिदा होतात.

अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घातली आहे.