Ananya Panday Affair: ईशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडे या अभिनेत्याला करतेय डेट?, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:13 PM2022-07-12T17:13:17+5:302022-07-12T17:22:30+5:30

Ananya Panday Affair: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव सध्या बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत जोडले जात आहे. हा अभिनेता अनन्या पांडेपेक्षा एक-दोन वर्षांनी मोठा नाही, तर १३ वर्षांनी मोठा आहे. दोघे एकत्र दिसले नसले तरी त्यांच्या नात्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत

अनन्या पांडे तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते. तिचे नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याशी जोडले जात आहे.

यापूर्वी अनन्या पांडेला शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरसोबत अनेकदा एकत्र दिसले होते. दोघेही अनेकदा एकत्र सुट्टीवर जाताना दिसले होते. इतकंच नाही तर अनन्याने इशानच्या कुटुंबियांना भेटायलाही सुरुवात केली होती.

शाहिदच्या वाढदिवसाच्या पार्टीतही अनन्या गेली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी समोर आली आणि आता अनन्या बॉलिवूडच्या दुसऱ्या अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे सध्या बॉलिवूडचा हँडसम हंक आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. हे दोघे कधीच एकत्र दिसले नसले तरी त्यांच्या अफेअरच्या चर्चा इंटरनेट जगतात खूप चर्चेत आहेत.

अनन्या आणि आदित्य कधीच चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. मात्र सध्या त्यांच्या अफेयरच्या चर्चेंने जोर धरला आहे.

आदित्य रॉय कपूर अनन्या पांडेपेक्षा एक-दोन वर्षांनी नाही तर १३ वर्षांनी मोठा आहे. आदित्य ३६ वर्षांचा आहे, तर अनन्या फक्त २३ वर्षांची आहे.

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लाइगर' चित्रपटात दिसणार आहे.

याशिवाय ती अभिनेत्री सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गये हम कहाँ' या चित्रपटातही दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करते आहे.