पहिल्याच नजरेत रणबीरच्या प्रेमात पडली होती आलिया, खूपच इंटरेस्टिंग आहे दोघांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:30 PM2024-04-15T15:30:22+5:302024-04-15T15:36:19+5:30

Ranbir Kapoor And Alia Bhatt : रणबीर कपूर आणि आलिया भट हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. हे जोडपे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर दोघांनी १४ एप्रिल, २०२२ मध्ये लग्न केले. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

रणबीर आणि आलिया त्यांच्या नात्याबद्दल खूप मोकळे आहेत. 'कॉफी विथ करण'मध्ये आलियाने तिची लव्हस्टोरी शेअर केली होती. हे दोघे पहिल्यांदा कधी भेटले आणि त्यांची मैत्री कशी प्रेमात बदलली, हे तिने सांगितले.

संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटाच्या सेटवर ती पहिल्यांदा रणबीरला भेटल्याचे आलियाने सांगितले होते. रणबीरने पहिल्यांदाच तिच्या मनात खास स्थान निर्माण केले होते.

रणबीर आणि आलियासाठी ब्रह्मास्त्र खूप खास आहे. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले.

ब्रह्मास्त्र दरम्यान आलिया आणि रणबीरची मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

डेटिंगदरम्यान रणबीर आणि आलिया प्रत्येक इव्हेंटमध्ये एकत्र दिसत होते. सोनम कपूरचे लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम. दोघेही व्हॅकेशनदेखील एकत्र एन्जॉय जायचे.

रणबीर आणि आलियाने त्यांचे नाते अधिकृत केले. १४ एप्रिल २०२२ रोजी दोघांचे लग्न झाले.

लग्नाच्या ७ महिन्यांनंतर आलिया भटने मुलगी राहाला जन्म दिला. अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात रणबीर आणि आलिया दिसणार आहेत.

निर्मात्यांनी गेल्या महिन्यात याची घोषणा केली होती.