अंबानींच्या शाळेत शिकते आराध्या बच्चन, एका वर्षाची फी पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 06:09 PM2023-10-09T18:09:00+5:302023-10-09T18:23:37+5:30

बच्चन कुटुंबियांची लाडकी लेक आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मुलं शिक्षण घेतात.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बच्चन कुटुंबाच्या घरची लेक आराध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

ऐश्वर्या आपल्या लेकीला प्रत्येक कार्यक्रमाला सोबत घेऊन जाते. कधी बॉलिवूड पार्टी तर कधी अंबानींच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या मायलेकी एकत्र स्पॉट होताना दिसतात.

आराध्या अमिताभ बच्चन यांचीही लाडकी आहे. नातीबरोबर बिग बींचे अगदी प्रेमाचे संबंध आहेत. अनेकदा बिग बी सोशल मीडियावरही लाडकी नात आराध्याबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.

बच्चन कुटुंबियांची लाडकी लेक आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मुलं शिक्षण घेतात.

नावाप्रमाणेच अंबानींच्या स्कूलची फीदेखील एकदम सेलिब्रिटींना शोभेल अशीच आहे. शिशूवर्गापासून ते ७वी पर्यंत या शाळेत १ लाख ७० हजार फी आकारली जाते. तर ८वी ते १२वी साठी ४ ते १२ लाखपर्यंत फी आहे.

आराध्याचे शाळेतील काही फोटोही व्हायरल झाले होते. मेकअप करुन शाळेत गेल्यामुळे आराध्याला ट्रोल केलं गेलं होतं.

ऐश्वर्या आणि अभिषेकने २००७ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर चार वर्षांनी ऐश्वर्या आणि अभिषेक आईबाबा झाले. १६ नोव्हेंबर २०११ला आराध्याचा जन्म झाला. ती ११ वर्षांची आहे.