4749_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 15:02 IST2016-04-03T22:02:24+5:302016-04-03T15:02:24+5:30

‘बालिका वधु’ या प्रसिद्ध मालिकेतुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूचे गूढ दरदिवसाला वाढत आहे. असे म्हटले जात आहे की, प्रत्युषाने तिच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेवून आत्महत्त्या केली. मात्र तिच्या घरच्यांकडून ही आत्महत्त्या नसून, हत्या असल्याचा आरोप केल्याने या संपुर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्याचबरोबर प्रत्युषाच्या मृत्यूचे गूढ देखील वाढले आहे. परंतु टिव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्युषाप्रमाणे बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी वयातच या जगातुन निरोप घेतला असून, त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. त्याच्या मृत्यूचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा स्पष्ट असा खुलासा केला गेला नसल्याने ही आत्महत्त्या की हत्या असा प्रश्न कायम आहे.