3832_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 07:18 IST2016-03-01T14:18:59+5:302016-03-01T07:18:59+5:30

एक जमाना होता, ज्यावेळी सुंदर अभिनेत्रींना चित्रपटात केवळ ‘शो पीस’ म्हणून भूमिका दिली जात असे. केवळ अभिनेत्यांना कॉम्प्लीमेंट देणे ऐवढेच काम या अभिनेत्रींकडून केले जात असे. मात्र, काळ बदलला आहे. आता बॉलीवुड सुंदºया डॅशिंग भूमिकांमध्ये दिसू लागल्या आहेत. अलीकडच्या काळातील ‘नीरजा’, ‘क्वीन’ या चित्रपटात सोनम कपुर आणि कंगना रणावत यांनी केलेली भूमिका त्याचे उत्तम उदाहरण देता येईल. मात्र हा बदल अचानक झाला नाही. यासाठी तब्बल १०० वर्षाचा काळ लागला आहे. आता तर पोलिसांच्या डॅशिंग भूमिकादेखील अभिनेत्री सहस साकारू लागली आहे. बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची प्रमुख भूमिका असलेला ‘जय गंगाजल’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशाच डॅशिंग पोलीस अधिकाºयांच्या भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींवर एक नजर...