3829_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 07:20 IST2016-02-28T14:20:26+5:302016-02-28T07:20:26+5:30

अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री सोनम कपूरचा धाकटा भाऊ हर्षवर्धन कपूर लवकरच बी टाउनमध्ये एण्ट्री करणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झीया’ या चित्रपटात तो झळकणार आहे. हर्षवर्धनने लॉस एंजेलिसमधून सिनेमॅटोग्राफी आणि स्क्रीनप्लेचा अभ्यास पूर्ण केला आहे आणि आता तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहेत. हर्षवर्धनसुद्धा वडील अनिल कपूर आणि बहीण सोनमप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव रोशन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याआधीही अनेक भाऊ-बहीण चित्रपटांत आले आहेत; परंतु यातील काही हिट तर काही फ्लॉप झाले आहेत. त्यांच्या बॉलिवूड प्रवासावर एक नजर...