विदेशात या आलिशान ठिकाणी थांबतात बॉलिवूड स्टार्स; एका रात्रीचे भाडे जाणून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-11T11:33:38+5:302018-06-27T19:57:34+5:30

तुम्हाला माहिती आहे काय की, तुमचे फेव्हरेट स्टार्स जेव्हा हॉलिडे एन्जॉय करायला विदेशात जातात तेव्हा नेमके कुठे मुक्कामी थांबत असतात?, शिवाय त्या ठिकाणांसाठी त्यांना किती पैसे मोजावे लागतात? आज याचाच खुलासा आम्ही करणार आहोत. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान नेहमीच त्याच्या फॅमिलीसोबत लॉस एंजेलिसला हॉलिडे एन्जॉय करायला जात असतो. याठिकाणी तो ब्रेवरी हिल्स मॅन्शन येथे थांबतो. या मॅन्शनमध्ये एका दिवसाचा मुक्काम करण्यासाठी जवळपास १.९७ लाख रुपये मोजावे लागतात. या मॅन्शनमध्ये सहा लग्झरी बेडरूम, जकूजी, पूल आणि प्रायव्हेट टेनिस कोर्ट आहे.