हॅपीवाला बर्थ डे क्युटी...!! वेड लावतील बर्थ डे गर्ल मानुषी छिल्लरचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 12:07 IST2020-05-14T11:39:01+5:302020-05-14T12:07:52+5:30
आज मानुषीचा वाढदिवस

हरियाणाच्या मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकला. हा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय ठरली. आज याच माजी मिस वर्ल्डचा वाढदिवस.
मिस वर्ल्ड बनल्यानंतर मानुषी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय.
अनेक दिवसांपासून ती बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या आणि मात्र या बातमीवर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
यश राज फिल्सने त्यांच्या ‘पृथ्वीराज’ या सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाची नायिका म्हणून मानुषीची निवड निश्चित केली आहे.
निर्भीड आणि पराक्रमी राजा पृथ्वीराज यांच्या जीवनावर आणि शौर्यावर हा चित्रपट आधारित असेल. तिच्या बरोबर पृथ्वीराज म्हणून सुपरस्टार अक्षय कुमारची निवड करण्यात आली आहे.
‘पृथ्वीराज’ सिनेमात राजा पृथ्वीराजाची देखणी प्रेयसी संयोगिताच्या भूमिकेत मानुषी झळकणार आहे. पृथ्वीराज चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.
मानुषी प्रशिक्षित कुचीपुडी नृत्यांगना आहे आणि तिने तिचे हे शिक्षण सुप्रसिद्ध नर्तक राजा आणि नर्तिका राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून घेतले आहे.
२०१७ साली मानुषीने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
मानुषी नेहमीच तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते.
मानुषीला अभिनय आणि मॉडेलिंगसोबत सिंगींग व ड्रॉर्इंगचाही छंद आहे.
मानुषीचे चाहते तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.