नागा चैतन्य पत्नी समंथासह सेलिब्रेट करतोय ३२ वा वाढदिवस, रोमँटीक फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 20:00 IST2020-11-23T20:00:00+5:302020-11-23T20:00:00+5:30
3 नोव्हेंबर 1986 ला हैद्राबाद येथे चैतन्यचा जन्म झाला. चैतन्यचे लग्न समांथा रूथसोबत झाले असून समांथा देखील अभिनेत्री आहे. समांथा आणि चैतन्य यांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केले होते.

नागा चैतन्यचे पूर्ण नाव नागा चैतन्य अक्केनेनी आहे. तो तेलुगु सिनेसृष्टी लोकप्रिय अभिनेता आहे.
त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले आहे.
आपल्या वडिलांप्रमाणेच त्याचे देखील जगभरात फॅनफॉलोइंग आहे.
हैदराबादमध्ये त्याचे आलिशान घर आहे. नेहमीच त्यांच्या घरातील निवातं क्षण एन्जॉय करतानाचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.
नागा चैतन्यने २००9 मध्ये अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले होते.
'जोश' या चित्रपटापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
यानंतर नागा चैतन्यने दक्षिण सिनेमाच्या बर्याच शानदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दोघेही आपल्या घराच्या गच्चीवर क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतानाचे फोटो नेहमी शेअर करतात.
समांथा आणि तिचा नागा चैतन्य यांचे आवडते ठिकाण त्यांच्या घराची गच्ची (टेरेस) आणि स्विमिंगपूल आहे .
इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे.