Anushka Sharma Retro Look : कोई कैसे उन्हे ये समझाए ! कला चित्रपटात अनुष्काचे सरप्राईज; 'रेट्रो लुक'वर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:21 AM2022-12-06T11:21:09+5:302022-12-06T11:30:42+5:30

अभिनेता इरफान खानच्या मुलाची डेब्यु फिल्म 'कला' ची सध्या खुप प्रशंसा होत आहे. या सिनेमातील आणखी एक सरप्राईज म्हणजे 'अनुष्का शर्मा'चा कॅमिओ. अनुष्काने यामध्ये एक गाणं केलं आहे आणि तिचा 'रेट्रो लुक' बघुन चाहते फिदा झालेत

अनुष्का शर्मा तब्बल ४ वर्षांच्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर दिसत आहे. तिला या रेट्रो लुक मध्ये बघून चाहते जाम खुश झाले आहेत. तिचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पांढरी साडी, साजेशी ज्वेलरी, जुना हेअरकट, चेहऱ्यावर सुंदर हास्य हे सर्व अनुष्काला शोभुन दिसत आहे.

ब्लॅक अॅंड व्हाईट थीम असलेल्या 'कोई कैसे उन्हे ये समझाए' या गाण्यात तिचा हा लुक खुप पसंत केला जातोय. चंद्रावर बसून अनुष्का हे गाणं गुणगुणताना दिसत आहे.

एका थिएटरमध्ये हे गाणं लावले असल्याचं दाखवलं आहे.त्यात सिनेमाची मुख्य अभिनेत्री थिएटरमध्ये बसून हे गाणं पाहत आहे.

अनुष्का गाण्यात जितकी सुंदर दिसतेय तितकाच तिचा सुंदर अभिनयही आहे. गाण्यातील तिच्या अदा, चेहऱ्यावरील हावभाव यावरुन तुमची नजरच हटणार नाही.

कला या सिनेमाच्या एकुणच टीमचे अनुष्काने सोशल मीडियावरुन कौतुक केले होते. कलेचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा असे तिने लिहिले. तसेच तिने अभिनेत्री त्रिप्ती डिमरीच्या टॅलेंटचेही कौतुक केले.

कला या सिनेमाचे म्युझिकही खुप पसंत केले जात आहे. अमित त्रिवेदीने सिनेमाला म्युझिक दिले आहे. अमित त्रिवेदी च्या गाण्यांचा तर कोण चाहता नाही. कला च्या म्युझिक अल्बम मधुन अमित त्रिवेदीने बॉलिवुडमध्ये रेट्रो काळ परत आणलाय.

एकुणच सिनेमाची गाणी, अभिनय जबरदस्त आहेत पण अनुष्काच्या कॅमिओवर चाहते अक्षरश: फिदा झालेत. अनुष्काने थोड्या वेळासाठी का होईना पडद्यावर येत चाहत्यांचे मन जिंकले आहे.

अनुष्काने स्वत: देखील सोशल मीडियावर हे फोटो अपलोड केले असून त्यावर कमेंट्सचा भडिमार सुरु झालाय.