आमिर खान आणि एली अवरामचे गाणे झाले रिलिज, एखाद्या कॉलेज तरुणाइतका आमिर दिसतोय सुंदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 17:10 IST2021-03-11T17:10:42+5:302021-03-11T17:10:42+5:30

आमिर खानचे नवीन गाणे प्रदर्शित झाले असून याच गाण्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
आमिर खान आणि एली अवराम यांच्यावर चित्रीत झालेले हरफन मौला हे गाणे लोकांना प्रचंड आवडत आहे.
आमिर खान आणि एली अवराम यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
आमिर या गाण्यात ब्लू जॅकेट, शर्ट आणि ब्राऊन ट्राऊजरमध्ये दिसत आहे. एखाद्या तरुणाइतका तो सुंदर दिसत असून त्याच्या फिटनेसची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
एलीदेखील या गाण्यात अतिशय सुंदर दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
आमिर खानने गेली अनेक वर्षं लोकांच्या हृद्यावर राज्य केले आहे. त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत.
आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आमिरची गणना केली जाते. आमिरला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.