'दंगल'मध्ये दिसली नाही फोगट कुटुंबातील ही व्यक्ती
By Admin | Updated: December 28, 2016 19:29 IST2016-12-28T18:49:35+5:302016-12-28T19:29:18+5:30
दंगलमध्ये महावीर यांच्या जीवनाचा बहुतांश भाग आणि कुटुंब दाखवण्यात आले असले तरी फोगट कुटुंबातील एका सदस्याचे पात्र मात्र या चित्रपटात दाखवण्याता आलेले नाही.

'दंगल'मध्ये दिसली नाही फोगट कुटुंबातील ही व्यक्ती
>ऑनलाइन लोकमत
पानिपत, दि. 28 - पैलवान महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींवर आधारित दंगल हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसचे मैदान गाजवत आहे. आठवडा पूर्ण होण्याआधीच या चित्रपटाने दीडशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सामान्य प्रेक्षकांपासून, समीक्षकांपर्यंत सर्वांकडूनच या चित्रपटाची वाहवा होत आहे. दंगलमध्ये महावीर यांच्या जीवनाचा बहुतांश भाग आणि कुटुंब दाखवण्यात आले असले तरी फोगट कुटुंबातील एका सदस्याचे पात्र मात्र या चित्रपटात दाखवण्यात आलेले नाही. तो म्हणजे महावीर यांचा मुलगा आणि फोगट भगिनींचा भाऊ दुष्यंत फोगट.
गीता, बबिता, रितू आणि संगीता या चार बहिणींचा भाऊ असलेल्या दुष्यंतचा जन्म 2003 साली झाला होता. मात्र त्याचे वडील आणि बहिणींवर आधारित चित्रपटात त्याची भूमिका दाखण्यात आलेला नाही. सध्या आठवीत शिकत असलेला दुष्यंतसुद्धा वडील आणि बहिणींप्रमाणेच कुस्तीपटू आहे. आपल्या बहिणींच्या कामगिरीमधून प्रेरणा घेत दुष्यंत गेल्या तीन वर्षांपासून कुस्तीचे धडे गिरवत आहे. मात्र दुष्यंतने अद्याप राज्य स्तरावर कुस्ती लढली नसली तरी गावात होणाऱ्या कुस्तीच्या मैदानात तो सहभाग घेतो. त्यामुळे फोगट बहिणींनंतर आता दुष्यंतही कुस्तीच्या मैदानात दणकेबाज कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.