'मनसू मल्लिगे'चे प्रदर्शन लांबले
By Admin | Updated: February 24, 2017 06:36 IST2017-02-24T06:36:09+5:302017-02-24T06:36:09+5:30
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. एवढेच नाही त

'मनसू मल्लिगे'चे प्रदर्शन लांबले
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. एवढेच नाही तर या चित्रपटाचे जागतिक पातळीवरदेखील कौतुक करण्यात आले. सैराटचे हे यश पाहता, प्रांतिक भाषेतील दिग्दर्शकदेखील या चित्रपटाच्या प्रेमात पडले. आता हेच पाहा ना, सैराट या चित्रपटाच्या कन्नड भाषेतील रिमेकची खूपच चर्चा आहे. त्यांच्या या चित्रपटाचे नाव ‘मनसू मल्लिगे’ असे आहे. या चित्रपटात अभिनेत्री आर्ची म्हणजे अर्थातच रिंकू राजगुरू झळकणार आहे. तिचा हा चित्रपट ९ फेब्रुुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र, दहावीच्या परीक्षेच्या अभ्यासात रिंकू बिझी असल्याने निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजले आहे. आता हा चित्रपट मार्च महिन्याच्या अखेरीस बॉक्स आॅफिसवर प्रदर्शित होणार आहे. रिंकूला नववीमध्ये ८४ टक्के गुण प्राप्त झाले होते. सैराट चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर रिंकूला शाळेत जाणेही कठीण झाले होते. त्यामुळे रिंकूने दहावीचा १७ नंबरचा फॉर्म भरला होता. आता ती दहावीची बाहेरून परीक्षा देणार आहे. ७ मार्च ते २५ मार्चदरम्यान तिचे पेपर असणार आहेत. रिंकूला मार्च महिन्यात दोन परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. एक दहावीची, तर दुसरी बॉक्स आॅफिसची.