लोकांना काहीतरी वेगळे हवेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 02:51 AM2016-09-12T02:51:40+5:302016-09-12T02:51:40+5:30

भारत-पाकिस्तान संबधावर, युद्धावर अनेक कथा व चित्रपट आले असतील. काही मनाला भावुक करणारे तर काही कॉमेडीचा मसाला लावल्याने चर्चेत राहिले

People want something different! | लोकांना काहीतरी वेगळे हवेय!

लोकांना काहीतरी वेगळे हवेय!

googlenewsNext

भारत-पाकिस्तान संबधावर, युद्धावर अनेक कथा व चित्रपट आले असतील. काही मनाला भावुक करणारे तर काही कॉमेडीचा मसाला लावल्याने चर्चेत राहिले. रोमँटिक चित्रपटासाठी ओळखला जाणारा निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक निखिल अडवाणी ‘प्रिझनर्स आॅफ वॉर-बंदी युद्ध के’ या मालिकेचे दिग्दर्शन करतो आहे. या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘प्रिझनर्स आॅफ वॉर’च्या निमित्ताने, ‘सीएनएक्स डिजिटल’च्या संपादिका जान्हवी सामंत यांच्याशी चित्रपट, टीव्ही मालिका व आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी दिलखुलास चर्चा केली.
ल्लरोमाँटिक फिल्म्स सोडून ‘प्रिझनर्स आॅफ वॉर्स’कडे तू कसा वळलास?-मी या ठिकाणी आलो आहे, याचे आश्चर्य सर्वांनाच आहे. यापूर्वी मी विविध ठिकाणी काम केले. तीन वर्षांपासून या मालिकेविषयी बोलणी सुरू आहेत. भारतीय एटीएस अथवा अतिरेक्यांच्या मागे पळणारे, खबऱ्यांच्या आधारे काम करणारे, लपूनछपून कारवाई करणारे पोलीस अशा कथा अनेक वर्षांपासून मी ऐकतोय. मला वेगळं काही तरी करायचं होतं. ज्यात खूप नाट्य, संलग्नता आणि पात्रांची सशक्त भूमिका असावी, अशी माझी इच्छा होती. मी या ठिकाणी काम करतो आहे, याबद्दल मलादेखील आश्चर्य वाटतंय. दोन व्यक्ती नरकातून परत येतील किंवा नाही, याबाबत साशंकता असते. अशा वेळी त्यांच्या संदर्भातील आश्चर्यकारक प्रश्नांकडे मी कधी पाहिलं नाही. इस्राईल आणि पॅलेस्टाईनविषयी आपण ऐकतो. दररोज त्यांच्यामध्ये
संघर्ष आहे. भारत आणि पाकिस्तानमध्येदेखील अशीच समानता आहे. भारतीय परिप्रेक्ष्यातून आपण या कथेकडे पाहतो, त्या वेळी आपल्याला त्याची जाणीव होते. ही
कथा केवळ हरलीन, नाजनीन, सरताज किंवा इमान यांची नाही; तर परिवार, संबंध, भावना, बलिदान, देशभक्तीची कहाणी आहे.
ल्लअशी कथा साकारताना तुझे निरीक्षण काय आहे, ज्यामध्ये इतर देशांमधील संघर्ष आहे?-आपण पॅलेस्टाईन आणि इस्राईलचा जरी विचार करीत असलो, तरी ते जागतिक सत्य आहे. आपली ओळख निर्माण करण्यासाठी हे सगळीकडे सुरू आहे. नैसर्गिक बाब म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. डी-डेमध्ये आपल्या हे लक्षात येईल. त्यामुळे आम्ही हा प्रिझनर्स आॅफ वॉर (पॉ) हातात घेतला. देशभक्ती हा माझा आवडता विषय आहे. डी-डेसह अनेक चित्रपटांत त्याचा समावेश आहे. या मालिकेत युद्धकैद्यांची आशा आणि अपेक्षांचे मिश्रण आहे.
ल्लडी-डेदेखील आश्चर्यकारक होता. अशा विषयांवर काम करताना तुला काय वाटतं?-मी सर्व काही जीव ओतून काम करतो. मला ते सिद्ध करून दाखवायचं असतं. अमेरिका जर त्यांना हवं तसं करीत असेल, तर आपण दाऊदच्या बाबतीत का करीत नाही? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. स्टारनं आम्हाला सर्व काही मुभा दिली. मी त्यांना स्क्रिप्ट दाखविली. त्यांनी मला ‘गो अहेड’ म्हणून सांगितलं.
ल्लभारतीय टेलिव्हिजनचे विषय आता बदलायला लागले आहेत, एकीकडे नागीण, पिशाच दाखविले जातात, तर दुसरीकडे सिरिअस ड्रामासह वेगवेगळ्या गोष्टी याबद्दल तुला काय वाटते?
-तुम्ही दर्शकांना प्रत्येक वेळी गृहीत धरू शकत नाहीत. मी 126वा एपिसोड हा पहिल्या एपिसोडप्रमाणे असायला हवा, यासाठी प्रयत्न करतो आहे.
ल्लहे तू सगळं कसं मॅनेज करतोस?-माझ्याकडे खरंच खूप चांगली टीम आहे. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. जे माझ्यासोबत आहेत किंवा माझ्या पाठीशी आहेत, त्या सर्वांच्या मदतीनं मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. दर्शकांना काय हवं ते कळालं पाहिजे. आता ‘मसान’ चित्रपट लोकांनी जाऊन पाहिला. लोकांना वेगळं काही तरी हवंय. पाच वर्षांपासून मी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय.
ल्लयादरम्यान तुझ्या लक्षात राहील, असं काही घडलं?
-माझ्याकडे खूप गुणी लेखक आहेत. कधी-कधी मला अ‍ॅक्टर विचारतो, की पुढील 10 एपिसोडनंतर तुम्ही असं का करीत नाही? त्या वेळी मी त्याला सांगतो, तू तोपर्यंत थांब. चित्रपट म्हणजे वेगात धावण्याची शर्यत आहे. टेलिव्हिजन म्हणजे मॅरेथॉन आहे.
ल्लया ड्रामाच्या कलाकारांसमवेत तुझी काय केमिस्ट्री आहे?-अमृता पुरी, संध्या मृदुल, सत्यदीप मिश्रा, मनीष चौधरी आणि पूरब कोहली यांनी खूप छान अभिनय केला आहे. मला सुदैवानं खूप चांगले कलाकार मिळाले आहेत. मी मनीषला 25 वर्षांपासून ओळखतो. अमृता आणि मी एकत्र काम केलं आहे. संध्या माझी जुनी मैत्रीण आहे. मी सत्यदीपसोबत
फार काम केलेलं नाही, तरीही मला त्याचं कौतुक वाटतं. तो सर्वांत चांगला अ‍ॅक्टर आहे.
ल्ल निर्माता आणि दिग्दर्शक या रोलमध्ये किती फरक आहे?-निर्माता म्हणून मी प्रत्येक गोष्टीत लक्ष देत नाही. मला ही कथा आवडली आहे; यावर काम करा, असं मी सांगतो. दिग्दर्शक म्हणून मी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. त्याशिवाय व्यावसायिक गणितं जुळविण्याचा मी प्रयत्न करतो.
ल्लआंतरराष्ट्रीय टीव्ही शोच्या विषयांवर तुझे काय मत आहे?
-प्रत्येक गोष्ट मला आवडते. नार्कोस, द नाईट आॅफ आॅर्थोडॉक्स मला आवडते. डच, इंग्लिश, ब्रिटिश, टर्किश आणि पाकिस्तानी शोदेखील मला आवडतात. लहानपणी दो किनारे, तनहाईयाँ, खानदान, बुनियाद, महाभारत पाहायचो. त्यांचा कन्टेन्ट हे समान सूत्र असून ते तत्कालीन परिस्थितीशी जोडलेलं असणे, हा मुख्य गाभा आहे. वागळे की दुनिया, नुक्कड, सर्कस या कथा लोकांच्या जीवनाशी निगडित आहेत.

Web Title: People want something different!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.