पीसी आणि दीपिकाच्या जुगलबंदीला ब्रेक
By Admin | Updated: April 11, 2015 23:03 IST2015-04-11T23:03:28+5:302015-04-11T23:03:28+5:30
संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणची जुगलबंदी रंगणार होती.

पीसी आणि दीपिकाच्या जुगलबंदीला ब्रेक
संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणची जुगलबंदी रंगणार होती. त्यामुळे दोघींच्याही चाहत्यांची धाकधूक शिगेला पोहोचली होती, मात्र दिग्दर्शक संजय भन्साळी याला काहीसा ब्रेक दिला आहे. आता फक्त पं. बिर्जू महाराज दीपिकासाठी कथ्थक सोलो डान्सचे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. सलग १२ रात्री जागून दीपिका या डान्स नंबरसाठी मेहनत घेणार आहे.