पल्लवी अशोकाची धर्मा
By Admin | Updated: February 2, 2015 23:44 IST2015-02-02T23:44:03+5:302015-02-02T23:44:03+5:30
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांना भुरळ पाडल्यानंतर पल्लवी सुभाष आता हिंदीत झळकणार आहे.

पल्लवी अशोकाची धर्मा
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांना भुरळ पाडल्यानंतर पल्लवी सुभाष आता हिंदीत झळकणार आहे. बहुचर्चित ‘अशोका’ या बिग बजेट सिरिअलमध्ये मराठमोळी पल्लवी सुभाष सम्राट अशोकाच्या आईची अर्थात ‘धर्मा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिकेतील तिची भूमिका आणि पेहराव अगदी साधे पण प्रभावशाली आहेत. ‘महाभारत’ या मालिकेत रुक्मिणीची भूमिका साकारल्यानंतर आता ती सज्ज झाली आहे धर्मा साकारण्यासाठी. या ड्रीम
रोलबद्दल सांगताना मालिकेतील सुस्पष्ट भाषा आणि धर्माचा लूक सांभाळणे हे एक प्रकारचे आव्हानच आहे, पण ते आव्हान पेलत
इतर भूमिकांना मिळालेला प्रतिसाद पाहता या धर्मालाही प्रेक्षक तितकाच प्रतिसाद देतील, असेही पल्लवी म्हणाली.