हमारी अधुरी कहाणी : प्रेमकथेचा दुर्दैवी शेवट!

By Admin | Updated: January 23, 2016 04:20 IST2016-01-23T02:49:06+5:302016-01-23T04:20:12+5:30

मागील अंकात आपण विवाहित जोडप्यांच्या ब्रेकअपबाबतची माहिती जाणून घेतली. प्रेमात असलेल्या दोन मनात दुरावा आला तरी देखील तो ब्रेकअप मानला जातो

Our Bad Story: The Unfortunate End of Love! | हमारी अधुरी कहाणी : प्रेमकथेचा दुर्दैवी शेवट!

हमारी अधुरी कहाणी : प्रेमकथेचा दुर्दैवी शेवट!

मागील अंकात आपण विवाहित जोडप्यांच्या ब्रेकअपबाबतची माहिती जाणून घेतली. प्रेमात असलेल्या दोन मनात दुरावा आला तरी देखील तो ब्रेकअप मानला जातो. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमकथेचा शेवट लग्नात होऊ शकणार नाही. दोघांनी दूर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रणबीर कपूरने प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर पडत आपले सामान गुंडाळले आणि थेट आई-वडिलांचे घर गाठले. बॉलीवूडमध्ये इतकी ब्रेकअप होतात, की त्या आता बातम्या उरल्या नाहीत. बॉलिवूडने अनेक प्रेमकथेचा दुर्दैवी शेवट होताना पाहिला. शेकडो रसिकांची हृदये मोडली आहेत. अशाच काही ब्रेकअप कथा, ज्यामुळे जुन्या कहाण्या समोर येतील...
सलमान खान - ऐश्वर्या रॉय
‘हम दिल दे चुके सनम’च्या या जोडप्याचे संबंध नेहमीच त्रासदायक होते. सलमानच्या विचित्र वागण्याने या दोघांमध्ये फूट पडली. सलमान ऐश्वर्याच्या घरी गेल्यानंतर या संबंधाची घडी विस्कटली. ऐश्वर्याने याबाबत तक्रार केली. आपल्या जुन्या मैत्रीणीविषयी बोलताना सलमानने 2002 साली सांगितले, ‘मी ऐश्वर्यावर प्रेम करीत होतो. मी शिकारी नव्हतो. पौगंडावस्थेतील मुलांप्रमाणे हे प्रेम नव्हते. ते अत्यंत शुद्ध स्वरूपाचे होते. ती हृदयापासून पारंपरिक भारतीय मुलगी होती.
शाहीद आणि करीना कपूर
‘फिदा’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हे दोघे प्रेमात पडले. या दोघांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘जब वुई मेट’ नंतर दोघे वेगळे झाले. शाहीदच्या मते दोघे फारसे गंभीर नव्हते. तथापि त्यानंतर त्यांनी एकत्र चित्रपट केले नाहीत. शाहीदने मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर करिना अथवा सैफला आमंत्रित केले नव्हते. यावरूनही जोरदार गॉसिप करण्यात आले.
रणबीर कपूर - दीपिका पदुकोन
बॉलीवूडची यशस्वी जोडी आणि 2008 सालची खऱ्या आयुष्यातील ही जोडी होती. वर्षानंतर दोघांनी दूर जाण्याचा निर्णय घेतला. कतरिना या ब्रेकअपसाठी कारण ठरली होती असे सांगितले जाते. क तरिना व रणबीरमध्ये दुरावा येण्याचे कारणही दीपिका मानली जात आहे. इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये असे अनेक वाद असतील, जे शेवटपर्यंत कायम राहिले. ‘तमाशा’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी रणबीर आणि त्याची पूर्वीची प्रेयसी दीपिका जवळ आल्याने कतरिना अस्वस्थ झाली होती. एका मुलाखतीत कतरिनाने हे बोलूनही दाखविले, ‘रणबीर आपल्या निवडीविषयी नेहमीच अनिश्चित असतो.’ रणबीरने आपल्या कुटुंबाच्या घरी जाण्याचा निर्णय घेऊन या प्रकरणाचा शेवट केला आहे. पाठोपाठ कतरिना ही देखील अपार्टमेंटमधून बाहेर पडली. रणबीर कपूर व कॅटरिना कैफ मागील काही दिवसांपासून एकमेकांना भेटले नाहीत.
फरहान अख्तर -
अधुना अख्तर
‘दिल चाहता है’ या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनादरम्यान फरहान व अधुना अख्तर यांची ओळख झाली. दोघांनी 2000 साली लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या 16 वर्षांनंतर फरहान व अधुना यांनी एक संयुक्तरित्या आपण वेगळे होते आहोत असे जाहीर केले आहे. फरहान व अधूना यांच्यात कोणत्या गोष्टीमुळे वितुष्ट आले हे अद्याप कळलेले नाही.

Web Title: Our Bad Story: The Unfortunate End of Love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.