Oscar Awards 2025: भारत 'ऑस्कर'ला मुकला! प्रियंका चोप्राच्या 'अनुजा'ला पुरस्कार नाही

By तेजल गावडे | Updated: March 3, 2025 08:49 IST2025-03-03T08:49:27+5:302025-03-03T08:49:52+5:30

Oscar Awards 2025: 'आय ॲम नॉट अ रोबोट' या चित्रपटाने 'अनुजा'ला मागे टाकत लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा किताब स्वतःच्या नावावर केला आहे.

Oscar Awards 2025: India misses out on 'Oscar'! Priyanka Chopra's 'Anuja' doesn't win an award | Oscar Awards 2025: भारत 'ऑस्कर'ला मुकला! प्रियंका चोप्राच्या 'अनुजा'ला पुरस्कार नाही

Oscar Awards 2025: भारत 'ऑस्कर'ला मुकला! प्रियंका चोप्राच्या 'अनुजा'ला पुरस्कार नाही

लॉस अँजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९७ व्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2025 Awards) सोहळ्याला सुरुवात झाली आहे. प्रियंका चोप्राची सह-निर्मिती असलेल्या 'अनुजा' (Anuja Short Film)ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये नामांकन मिळाले होते. मात्र व्हिक्टोरिया वारमेर्डन आणि ट्रेंटच्या 'आय एम नॉट अ रोबोट'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला. ॲडम जे ग्रेव्हज आणि सुचित्रा मित्तई यांच्या अनुजा या चित्रपटाच्या हातून ऑस्कर निसटला. आतापर्यंत विकेड,  'एमिलिया पेरेझ' आणि  'अनोरा' या चित्रपटांना प्रत्येकी २ पुरस्कार मिळाले आहेत.

यंदाच्या ऑस्करमधून भारताची निराशा झाली आहे. आधीच किरण रावचा 'लापता लेडीज' सिनेमा 'ऑस्कर २०२५'च्या शर्यतीतून बाहेर गेला. मात्र गुनीत मोंगा कपूर निर्मित लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म 'अनुजा' (Guneet Monga short film Anuja) शॉर्टलिस्ट झाली होती. ही शॉर्ट फिल्म वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करते. यामध्ये मराठी अभिनेता नागेश भोसलेसह अनेक कलाकार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्राने शॉर्ट फिल्मच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. मात्र आय ॲम नॉट अ रोबोट या चित्रपटाने अनुजाला मागे टाकत हा किताब स्वतःच्या नावावर केला आहे.

Web Title: Oscar Awards 2025: India misses out on 'Oscar'! Priyanka Chopra's 'Anuja' doesn't win an award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.