OMG ! २०१७मध्ये खिलाडी अक्षयचे ७ चित्रपट ?
By Admin | Updated: September 9, 2016 07:05 IST2016-09-09T07:04:41+5:302016-09-09T07:05:10+5:30
२०१७ च्या सुरवातीला खिलाडी अक्षय वकिलाच्या भुमिकेत आपल्या समोर येणार आहे. जॉली एलएलबीच्या पुढील भागात अक्षय आपल्याला वकिलाच्या भुमिकेत पहायला मिळणार आहे.

OMG ! २०१७मध्ये खिलाडी अक्षयचे ७ चित्रपट ?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - एका वर्षात ४ -३ चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा खिलाडी अक्षयचे पुढील वर्षी ७ चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. प्रत्येक वर्षी ४ चित्रपटापैकी २ सुपरहीट तर २ सरासरी यश मिळत असते पण यावर्षी खिलाडीच्या तिन्हीं चित्रपटाने तिकिटखिडकीवर १०० करोट रुपयांचा व्यवसाय करत आपला स्टारटम दाखवून दिला. रुस्तम चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्या बॉक्स ऑफिसवर १०० करोड रुपयांची कमाई केली आहे. टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा रुस्तम हा २०१६ मधील तिसरा चित्रपट आहे. आणि सर्वचं चित्रपटाने तिकिटबारीवर १०० करोडचा गल्ला जमवला आहे. एअर लिफ्ट या सत्यकथेवर आधारीत सिनेमातल्या रणजीत कटयालची भूमिका गाजवल्यानंतर रुस्तम पावरी ही देखील सत्यकथेवर आधारीत भूमिका अक्षयने यशस्वी करून दाखवली तर हाउसफूलच्या तिसऱ्या भागात प्रेषकांना खळखळूंन हसवले.
२०१७मध्यील चार चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. तर ३ चित्रपटाच्या कथनाकावर काम चालू असल्याचे एका वेबसाईटने वृत्त दिले आहे. २०१७ च्या सुरवातीला खिलाडी अक्षय वकिलाच्या भुमिकेत आपल्या समोर येणार आहे. जॉली एलएलबीच्या पुढील भागात अक्षय आपल्याला वकिलाच्या भुमिकेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटात खिलाडीसोबत हुमा कुरैशी दिसणार आहे. जानेवारीमध्ये चित्रपट चित्रपटगृहात झळकेल.
जॉली एलएलबीनंतर खिलाडी आपल्याला खलनायकाच्या भुमिकेत दिसेल. सुपरस्टार रजनिकांत यांच्या रोबट २ मध्ये तो खलनायकाची भुमिका साकरत आहे.
नीरज पांडे दिग्दर्शित अक्षय कुमारचा आगामी सिनेमा क्रॅकच्या प्रदर्शनाची तारीख पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनी निश्चित केली आहे.
नमस्ते लंडन बद्दल अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार २०१७च्या सुरवातीला याचे शुटींग सुरु होइल.
नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनवर प्रेरित ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे शुटींग देखिल पुढिल वर्षी होणार आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे.
हेरा फेरी आणि फिर हेराफेरी नंतर या पठडीतील पुढील भाग २०१७च्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. याच्या कथनाकवर काम सुरु आहे. सर्व काही वेळेवर झाल्यास हेराफेरी ३ पुढील वर्षीच चित्रपटगृहात झळकेल.
साउथचचा सुपरहिट चित्रपट थेरी याच्या हिंदी रिमेकचे हक्क अक्षय कुमारने विकत घेतले आहेत. आणि त्याच्या पटकथेवर काम सुरु झाले आहे. साउथमध्ये विजयने मुख्य भुमिका केली होती. जर सगळ व्यवस्थित झाल्यास २०१७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होउ शकतो. अन्यथा २०१८ च्या सुरवातीला.
वरील सर्व बाबींचा विचार केला असता अक्षयचे ४ चित्रपट पुढिल वर्षी नक्की चित्रपटगृहात झळकतील आणि ३ चित्रपावर खिलाडी काम करोल. जर डेटस आणि पुरेसा वेळ भेटल्यास खिलाडीचे ७ चित्रपट चित्रपटगृहात झळकतील.