ओम पुरी म्हणतात, ‘‘मी महाराष्ट्राचा!’’
By Admin | Updated: May 7, 2015 22:43 IST2015-05-07T22:43:37+5:302015-05-07T22:43:37+5:30
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी ‘१५ आॅगस्ट भागिले २६ जानेवारी’ या सिनेमात काम करीत आहेत. पुरुषोत्तम बोरकर दिग्दर्शित या सिनेमात प्रेमा

ओम पुरी म्हणतात, ‘‘मी महाराष्ट्राचा!’’
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी ‘१५ आॅगस्ट भागिले २६ जानेवारी’ या सिनेमात काम करीत आहेत. पुरुषोत्तम बोरकर दिग्दर्शित या सिनेमात प्रेमा किरण, मनोज जोशी, भाऊ कदम आणि किशोरी शहाणे अशी स्टारकास्ट असेल. या सिनेमात सध्याच्या राजकीय परिस्थितीचे आणि राज्यकर्त्यांच्या कहाणीचे वास्तववादी चित्रण दिसेल. याविषयी बोलताना ओम पुरी म्हणाले की, मी बराच काळ महाराष्ट्रात राहतोय, त्यामुळे ‘मी महाराष्ट्रा’चा आहे.