'ओम फट् स्वाहा! पावरी करू नका, कोरोना वाढतोय', तात्या विंचूचा नागरिकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 17:04 IST2021-02-25T17:04:11+5:302021-02-25T17:04:43+5:30

सगळीकडे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढताना दिसत आहे.

'Om Fat swaha! Don't do pawri, Corona is growing ', Tatya Vinchu warned the citizens | 'ओम फट् स्वाहा! पावरी करू नका, कोरोना वाढतोय', तात्या विंचूचा नागरिकांना इशारा

'ओम फट् स्वाहा! पावरी करू नका, कोरोना वाढतोय', तात्या विंचूचा नागरिकांना इशारा

सगळीकडे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढताना दिसत आहे. लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. कित्येक जण मास्क न लावता, गर्दी करून कोरोनाचा प्रसार वाढत आहेत. अशा लोकांना तात्या विंचूने धोक्याचा इशारा दिला आहे. पावरी करू नका, कोरोना वाढतोय, असे तात्या विंचू सांगतो आहे.

प्रसिद्ध शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि सत्यजित पाध्ये यांचा तात्या विंचू बाहुला खूप लोकप्रिय आहे. तात्या विंचू मनोरंजनाबरोबर जनजागृती करण्याचे काम करतो. सामाजिक संदेश घेऊन आपल्या भेटीला येतो. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तात्या विंचूने कोरोनाविषयक जागृती केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तो संदेश घेऊन आला आहे. यावेळी सोशल मीडियावर सध्या ज्या 'पावरी'चा धुमाकूळ पहायला मिळतो आहे. त्याचा आधार घेऊन तात्या आपल्याला काहीतरी सांगताना दिसतोय.


या व्हिडीओत तात्या विंचू म्हणतोय की, 'नमस्कार मी तात्या विंचू. ये हमारी 'पावरी' हो रही है. पार्टी कसली करताय. कोरोनाच्या केसेस वाढत चालल्यात. वॅक्सिन आली तरी पार्टी करून गर्दी करू नका. नाहीतर कोरोनाचा आत्मा तुमच्यात आणि तुमचा आत्मा बाहेर. ओम फट स्वाहा,' 
सोशल मीडियावर गाजलेल्या 'पावरी' व्हिडीओचा संदर्भ घेऊन कोरोना विषयक जनजागृतीसाठी तात्या विंचूचा व्हिडीओ तयार केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Web Title: 'Om Fat swaha! Don't do pawri, Corona is growing ', Tatya Vinchu warned the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.