आता "या" शोमध्ये दिसणार सुनील ग्रोव्हर व अली असगर
By Admin | Updated: April 18, 2017 22:07 IST2017-04-18T21:53:33+5:302017-04-18T22:07:58+5:30
नव्या शोमध्ये सुनील ग्रोवरसोबत द कपिल शर्मा शोमधला त्याचा सहकलाकार अली असगरही असणार आहे.

आता "या" शोमध्ये दिसणार सुनील ग्रोव्हर व अली असगर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - एकीकडे द कपिल शर्मा शोचा टीआरपी दिवसेंदिवस घसरताना पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे कॉमेडियन किंग सुनील ग्रोव्हर नव्या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. या नव्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरसोबत द कपिल शर्मा शोमधला त्याचा सहकलाकार अली असगरही असणार आहे.
मात्र हे दोन्ही कॉमेडियन इतर कुठल्या नव्हे, तर सोनी टीव्हीवरच्या "सबसे बडा कलाकार" यात दिसणार आहेत. मंगळवारी त्यांनी याचा एक एपिसोड शूट केला आहे. मात्र हा एपिसोड सोनी टीव्हीवर 7 मे रोजी रात्री 8 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी चॅनेलवरील प्रेक्षकांच्या भेटीला येणारा "सबसे बडा कलाकार" हा एक टीव्ही रिएलिटी शो आहे. या शोमध्ये सुनील ग्रोवर आणि अली असगर हे दोन्ही कॉमेडियन कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. कपिल शर्मासोबतच्या झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवर आणि अली असगर द कपिल शर्मा शोमध्ये दिसले नाहीत. त्यानंतर कपिल शर्मानं स्वतःच्या मनोरंजन शोचा टीआरपी परत आणण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा केली आहे.
कपिल शर्मानं बुआ जी म्हणजेच उपासना सिंह यांनाही शोमध्ये परत आणलं आहे. मात्र सुनील ग्रोव्हरला त्याचे चाहते द कपिल शर्मा शोमध्ये मिस करत आहेत. मात्र सुनील ग्रोव्हरनं फॅन्ससाठी इतरही वेगळे शो केले आहेत. सुनील ग्रोव्हरनं दिल्लीतही इंडियन आयडलसाठी एक एपिसोड शूट केला आहे. सुनील ग्रोव्हर आणि अली असगर यांनी सोनी चॅनेलसोबत एक कॉन्ट्रॅक्ट केलं असून, हे कॉन्ट्रॅक्ट 28 एप्रिलला संपणार आहे.