आता खुश आहे प्रियंका
By Admin | Updated: September 10, 2014 05:44 IST2014-09-10T05:44:59+5:302014-09-10T05:44:59+5:30
‘मेरी कॉम’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी प्रियंका चोप्रा म्हणाली होती की, हा चित्रपट अपयशी ठरला तर तिला खूप वाईट वाटेल.

आता खुश आहे प्रियंका
‘मेरी कॉम’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी प्रियंका चोप्रा म्हणाली होती की, हा चित्रपट अपयशी ठरला तर तिला खूप वाईट वाटेल. प्रियंका आणि प्रियंकाच्या फॅन्ससाठी आता चांगली बातमी आहे. ‘मेरी कॉम’ने फक्त तीन दिवसांत २७.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटासाठी १५-१८ कोटी खर्च आला आहे. त्यामुळे हा चित्रपट आता नफ्यात आहे. पहिल्या दिवशी ८ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगला व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी ९ कोटी, तर तिसऱ्या दिवशी १० कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या ‘मेरी कॉम’चा पहिल्या तीन दिवसांतील एकूण व्यवसाय २७.५० कोटींचा झाला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५० कोटींचा व्यवसाय करण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाच्या पहिल्या तीन दिवसांच्या व्यवसायाने मात्र हा चित्रपट १०० कोटींच्या घरात पोहोचेल याची शक्यता जरा कमीच वाटते.