‘रईस’ संकटात
By Admin | Updated: October 23, 2015 03:06 IST2015-10-23T03:06:03+5:302015-10-23T03:06:03+5:30
पा किस्तानी अभिनेत्री महिरा खान ही बॉलीवूडमध्ये राहुल ढोलकीया यांच्या ‘रईस’मधून डेब्यू करण्यास तयार आहे. ती या चित्रपटात शाहरूख खानसोबत काम

‘रईस’ संकटात
पा किस्तानी अभिनेत्री महिरा खान ही बॉलीवूडमध्ये राहुल ढोलकीया यांच्या ‘रईस’मधून डेब्यू करण्यास तयार आहे. ती या चित्रपटात शाहरूख खानसोबत काम करणार आहे. मात्र, पाकिस्तानी अभिनेत्रीचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ द्यायचा नाही, म्हणून विरोध आहे. शिवसेनेचे जनरल सेक्रेटरी अक्षय बर्दापूरकर म्हणाले,‘ आम्ही कुठलाही पाकिस्तानी कलाकार, क्रिकेटर आणि परफॉर्मर यांचा चित्रपट महाराष्ट्राच्या मातीवर रिलीज होऊ द्यायचा नाही, असे आम्ही पाऊल उचलले आहे. आम्हाला याबद्दल काहीही त्रास नाही की या पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात कोण घेतात ते? करण जोहर, फरहान अख्तर, शाहरूख खान हे जबाबदार नागरिक असून त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या चित्रपटात घ्यायला नको.’ शिवसेनेने नुकतेच पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना मुंबईत परफॉर्म करण्यास विरोध केला होता.