‘रॉकी हँडसम’मध्ये निशिकांत-जॉन पुन्हा एकत्र

By Admin | Updated: January 24, 2016 01:48 IST2016-01-24T01:48:39+5:302016-01-24T01:48:39+5:30

‘सातच्या आत घरात’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ असे मराठी, ‘इवानू ओरूवान’ हा तामिळ, तर ‘हवा आने दे’, ‘मुंबई मेरी जान’, ‘फोर्स’, ‘दृश्यम’ हे हिंदीतील असे एक से बढकर एक चित्रपट

Nishikant-John reunited in 'Rocky Handsom' | ‘रॉकी हँडसम’मध्ये निशिकांत-जॉन पुन्हा एकत्र

‘रॉकी हँडसम’मध्ये निशिकांत-जॉन पुन्हा एकत्र

‘सातच्या आत घरात’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ असे मराठी, ‘इवानू ओरूवान’ हा तामिळ, तर ‘हवा आने दे’, ‘मुंबई मेरी जान’, ‘फोर्स’, ‘दृश्यम’ हे हिंदीतील असे एक से बढकर एक चित्रपट देणारा दिग्दर्शक निशिकांत कामत आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपट काढायला सज्ज झाला आहे. जॉन इब्राहम आणि निशिकांत कामत ही फोर्समध्ये हिट झालेली जोडी आगामी चित्रपट ‘रॉकी हँडसम’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन इब्राहमने महत्त्वाची भूमिका तर साकारली आहेच, पण त्याचबरोबर त्याने चित्रपटाची निर्मितीही केली आहे. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेत्री श्रुती हसन मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टे्रलर नुकताच प्रदर्शित करण्यात आल्यामुळे आणि निशिकांत कामत यांच्या आजवरच्या दर्जेदार चित्रपटांमुळे या
चित्रपटाबद्दलही बरीच उत्सुकता आहे.

Web Title: Nishikant-John reunited in 'Rocky Handsom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.