केला नवा संकल्प!
By Admin | Updated: March 27, 2017 05:11 IST2017-03-27T05:11:26+5:302017-03-27T05:11:26+5:30
2 टअऊ या कार्यक्रमाच्या मंचावर आतापर्यंत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, अहमद खान, कंगणा रणौट यांसारख्या अनेक कलाकारांनी

केला नवा संकल्प!
2 टअऊ या कार्यक्रमाच्या मंचावर आतापर्यंत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, अहमद खान, कंगणा रणौट यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली असून त्यांनी स्पर्धकांना अधिक चांगल्याप्रकारे नृत्य करण्यास प्रोत्साहित केले आहे. या कार्यक्रमात गुढीपाडव्यानिमित्त सई ताम्हाणकरने हजेरी लावली होती. या भागात पलकने लल्लाटी भंडार तर मितालीने सुंदर नाट्यसंगीतावर नृत्य सादर केले. श्रीदळवीने विंचू चावला आणि तुषारने डोकं फिरलंया हा गाण्यांवर तुफान नृत्य सादर करून सईचे मन जिंकले. सईने सोनल विचारेचे विशेष कौतुक केले आणि ती सईची लाडकी स्पर्धक आहे असे देखील तिला सांगितले. हे ऐकून सोनलला खूपच आनंद झाला. तुषारने सईसोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सईने त्याची ही इच्छा लागलीच पूर्ण केली. 2 टअऊ च्या मंचावर सईने आपल्या नृत्याबद्दलच्या काही भावना व्यक्त केल्या आणि तिचा नवीन वषार्चा संकल्प प्रेक्षकांना सांगितला. ती सांगते, नवीन वर्षात मी आत्मविश्वासाने डान्स करायला शिकणार आहे.