नायिकांचा भाव वधारला!

By Admin | Updated: January 11, 2016 02:02 IST2016-01-11T02:02:23+5:302016-01-11T02:02:23+5:30

बॉलिवूडच्या नायिकांना सध्या चांगले दिवस आले आहेत. अनेक नायिकांचे चित्रपट हिट होत असल्यामुळे त्यांनी आपले मानधन चांगलेच वाढवले आहे. दीपिकाने तर चक्क २ कोटीने ही रक्कम वाढवलीय.

Nayak prices rise! | नायिकांचा भाव वधारला!

नायिकांचा भाव वधारला!

बॉलिवूडच्या नायिकांना सध्या चांगले दिवस आले आहेत. अनेक नायिकांचे चित्रपट हिट होत असल्यामुळे त्यांनी आपले मानधन चांगलेच वाढवले आहे. दीपिकाने तर चक्क २ कोटीने ही रक्कम वाढवलीय. दीपिकाला घेऊन चित्रपट काढायचा असेल, तर निर्मात्याला आता १५ कोटी रुपये मोजावे लागतील. बॉलिवूडमधील सर्वाधिक रक्कम घेणारी ती अभिनेत्री ठरली आहे. पिकू, तमाशा आणि बाजीराव मस्तानीच्या यशामुळे तिची मागणी वाढली आहे. यापूर्वी सर्वाधिक रक्कम म्हणजे, ११ कोटी रुपये घेणाऱ्या कंगना राणावतला तिने मागे टाकले आहे. ‘क्वीन’ फेजमुळे कंगनाने तिच्या मानधनात वाढ केली आहे. नायकांचा विचार केला तर बॉलिवूडमध्ये सध्या सलमान खान सर्वाधिक रक्कम म्हणजे ६० कोटी रुपये घेतो! अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षय कुमार हे फोर्ब्सच्या जागतिक यादीतील कलाकार आहेत. जगातील सर्वोच्च कमाई असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
करिना कपूर - ९ कोटी
करिना प्रत्येक चित्रपटाबाबत खूपच ‘चुझी’ आहे. आर. बल्कीच्या ‘की अँड का’ चित्रपटात ती काम करते आहे. उडता पंजाब या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. हे सर्व चित्रपट तिने प्रत्येकी ९ कोटी रुपयांमध्ये स्वीकारले.
दीपिका पदुकोन - १५ कोटी
दीपिकाने प्रत्येक चित्रपटासाठी १५ कोटी रुपये मानधन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिला नवागत दिग्दर्शकांसोबत काम करण्यास कोणतीही अडचण वाटत नाही. अगदी कमी बजेटचे चित्रपटही ती करते. २०१५ साली ब्लॉकबस्टर ठरलेला बाजीराव मस्तानीसारखा चित्रपट तिच्या हाती आहे.
प्रियंका चोप्रा - ९ कोटी
सध्या अमेरिका आणि मुंबई या दरम्यान प्रियंकाचा प्रवास सुरू आहे. क्वांटिकोसाठी तिने ९ कोटी रुपये घेतले आहेत. बाजीराव मस्तानीमधील ‘काशीबाई’च्या भूमिकेमुळे तिच्या मानधनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
विद्या बालन - ७ कोटी
महिला केंद्रीत चित्रपटांसाठी निर्मात्यांची ती पहिली पसंती आहे. प्रत्येक चित्रपटासाठी ती ६ ते ७ कोटी रुपये मानधन घेते.
कॅटरिना कैफ - ७ कोटी
कॅटचे मानधन सर्वसाधारण आहे. कोणत्याही चित्रपट निर्मात्याला परवडणारे आहे. येत्या काही दिवसात ती आणखी चित्रपट करू शकते.
सोनाक्षी सिन्हा
- ६ कोटी
तिच्या फॅनची संख्या मोठी आहे. जबरदस्त अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. प्रत्येक वर्षी तीन ते चार चित्रपट तिच्या हाती आहेत. प्रत्येक चित्रपटासाठी ती ५ ते ६ कोटी रुपये मानधन घेते.
अनुष्का शर्मा - ६ कोटी
अनुष्का या यादीतील डार्क हॉर्स आहे. तिने हळूहळू आपले स्थान पक्के केले आहे. एन. एच. १० सारखे चित्रपट मिळाले तर तिच्या मानधनात नक्कीच वाढ होऊ शकते.
क्वीन आणि तनू वेड्स मनू रिटर्नस्सारखे चित्रपट केलेल्या कंगनाने नवीन चित्रपटासाठी ११ कोटी रुपये घेतले आहेत. तिला योग्य वाटेल असे चित्रपट तिने स्वीकारले. तिच्या हाती चार मोठे चित्रपट आहेत. यामध्ये विशाल भारद्वाजचा रंगून, हंसल मेहताचा सिमरन आणि केतन मेहताचा राणी लक्ष्मीबाई यांचा समावेश आहे.
श्रद्धा कपूर - ५ कोटी
या व्यवसायात श्रद्धा अत्यंत वेगाने पुढे येत आहे. प्रेम कथा (आशिकी २), थ्रिलर (एक व्हिलन), नाट्य (हैदर) आणि नृत्य (एबीसीडी-२) याद्वारे तिने आपले अभिनयकौशल्य दाखविले आहे.

Web Title: Nayak prices rise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.