‘उडान’मध्ये येणार नवाजुद्दीन
By Admin | Updated: August 13, 2015 23:48 IST2015-08-13T23:48:10+5:302015-08-13T23:48:10+5:30
‘माझी’ या सिनेमामुळे सध्या चर्चेमध्ये असणाऱ्या नवाजुद्दीनची स्वातंत्र्यदिनी कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम उडानमध्ये विशेष एन्ट्री होणार आहे.

‘उडान’मध्ये येणार नवाजुद्दीन
मुंबई : ‘माझी’ या सिनेमामुळे सध्या चर्चेमध्ये असणाऱ्या नवाजुद्दीनची स्वातंत्र्यदिनी कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम उडानमध्ये विशेष एन्ट्री होणार आहे. बालमजुरी आणि अवयव तस्करीमधून चकोर या मुलीची सुटका करणार आहे तसेच या कार्यक्रमामध्ये झेंडावंदनही करणार आहे.
‘उडान’ या विशेष प्रेरणादायी कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनी चकोर या लहान मुलीची कहाणी दाखविण्यात येणार आहे. चकोर या खेडेगावात राहणाऱ्या मुलीला वेठबिगारीवर राहावे लागत असते. तिच्याप्रमाणे तिच्या संपूर्ण गावालाही वेठबिगारीचा सामना करावा लागत असतो. या वेठबिगारीमधून स्वत: आणि संपूर्ण गावाला बाहेर काढण्यासाठी चकोर प्रयत्नशील असते. मात्र दुर्दैवाने अवयव तस्करीच्या रॅकेटला बळी पडून ती मुंबईमधील झोपडपट्टीत येते. या झोपडपट्टीत लहान मुलांना बंदी बनवून त्यांचे अवयव काढून विकण्यात येत असतात. या वाईट स्थितीमधून सर्वांना बाहेर काढण्याची इच्छा चकोरला असते, मात्र प्रत्येक आठवड्याला थोडे थोडे रक्त काढून घेतल्यामुळे तिचीही तब्येत खालावत असते. या सर्व पार्श्वभूमीवर नवाज झेंडावंदनासाठी स्वातंत्र्यदिनी त्यांच्या परिसरामध्ये येतो आणि त्यांना आपल्या भाषणाद्वारे लढायची प्रेरणा देतो.