नवाजुद्दीनवर हुंडयासाठी छळाचा आरोप
By Admin | Updated: October 2, 2016 09:05 IST2016-10-02T09:05:26+5:302016-10-02T09:05:26+5:30
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या घरच्यावर हुंडयासाठी छळाचा आरोप करण्यात आला आहे.

नवाजुद्दीनवर हुंडयासाठी छळाचा आरोप
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने गाजत असलेला व शेतकरी म्हणूनही प्रसिद्धीस येत असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वहिनीने त्याच्यावर तसेच सासरच्या अन्य लोकांवर हुंड्यासाठी छळ व मारहाण केल्याचा आरोप केला असून तशी तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. पोलिस सुपरिटेंडेंट राकेश जौली यांनी दिलेल्या माहितीनुसार नवाजुद्दीनच्या धाकट्या भावाच्या पत्त्नीने अशी तक्रार दिली आहे. नवाजुद्दीन सध्या त्याच्या गावातच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नवाजुद्दीनचा भाऊ निजामुद्दीन याचे जाफराबाद येथील मुलीशी ३१ मे २०१६ रोजी लग्न झाले आहे. या मुलीला २८ सप्टेंबर रोजी नवाजुद्दीन, तिचा नवरा व सासरच्या अन्य लोकांनी पैसे आणावे म्हणून मारहाण केली. मुलीचे काका काकू येथे आले होते त्यांनाही मारहाण केली गेली. ही मुलगी गरोदर असून तिचा गर्भपात व्हावा म्हणून नवाजुद्दीनने तिच्या पोटावर लाथा मारल्याचीही तक्रार तिने दिली आहे. तसेच नवर्याने नशेच्या गोळ्या व इंजेक्शन जबरदस्तीने दिल्याचाही तिचा आरोप आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत.