सलमानसाठी आयटम साँग करणार नर्गिस
By Admin | Updated: June 21, 2014 22:57 IST2014-06-21T22:57:15+5:302014-06-21T22:57:15+5:30
सलमान खानचा किक हा चित्रपट 25 जुलै रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटातील एक आयटम साँग अद्याप शूट करायचा राहिला आहे.

सलमानसाठी आयटम साँग करणार नर्गिस
>सलमान खानचा किक हा चित्रपट 25 जुलै रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटातील एक आयटम साँग अद्याप शूट करायचा राहिला आहे. या आयटम साँगसाठी यापूर्वी दीपिका पदूकोणला ऑफर देण्यात आली होती; पण तारखांची समस्या सांगून तिने नकार दिला. खरे तर तिला सलमानची नायिका बनायचे आहे, त्यामुळे आयटम साँग करणो तिला योग्य वाटले नाही. दीपिकानंतर हिरोपंतीची हिरोईन कृती सेनच्या नावावरही विचार करण्यात आला, अखेर नर्गिस फाखरीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सलमानचा चित्रपट मिळाल्याने नर्गिसही खूप खुश आहे. हे आयटम साँग ग्लॅमरस असणार आहे, नर्गिसही त्यात बोल्ड लुकमध्ये दिसेल.